Join us  

Controversy! फॅफ ड्यू प्लेसिसने MI विरुद्धचा 'Toss' चा झोल पॅट कमिन्सला सांगितला? Video Viral 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची वाटचाल प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या दिशेने सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 7:57 PM

Open in App

IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची वाटचाल प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या दिशेने सुरू आहे. सहापैकी ५ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे आणि आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना विजय आवश्यक आहे. SRH ने ५ मध्ये ३ सामने जिंकून चौथे स्थान पटकावले आहे. मागील सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावूनही RCB ला हार पत्करावी लागली. स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असेल तर विराटला सर्व सहकाऱ्यांनी साथ देणे आवश्यक आहे.

आजच्या सामन्यातील स्टॅट्स

  • अब्दुल समद याला आयपीएलमध्ये SRH कडून ५०० धावा पूर्ण करण्यासाठी ३६ धावांची गरज आहे
  • अभिषेक शर्मा आज SRH कडून पन्नासावा आयपीएल सामना खेळणार आहे
  • आयपीएलमध्ये SRH साठी भुवनेश्वर कुमारला १५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ बळी आवश्यक आहे
  • मोहम्मद सिराजला ट्वेंटी-२०त १५० विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी ३ बळी गरजेचे आहेत
  • फॅफ ड्यू प्लेसिस ( ३४३) व विराट कोहली ( २४६) यांनी अनुक्रमे ७ षटकार व ४ चौकार खेचल्यास त्यांच्या नावे विक्रम होईल.  

ल्युकी फर्ग्युसनने आजच्या सामन्यातून RCB कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांनी आज मोहम्मद सिराज व ग्लेन मॅक्सवेल यांना बाकावर बसवले. या सामन्याच्या आधी RCB ला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात टॉसच्या वेळी घोळ झाल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून वादही झाला होता. पण, तो व्हिडीओ चुकीचा असल्याचा दावा करणारा व्हिडीओही समोर आला. आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात टॉसच्या वेळी फॅफ व पॅट कमिन्स यांच्यात काही संवाद झालेला पाहायला मिळाला. त्यावरून RCB चा कर्णधार फॅफ MI विरुद्धच्या सामन्यातील टॉसचा झोल कमिन्सला सांगत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि कमिन्सचा चेहरा पाहण्यासारखा होता.   

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएफ ड्यु प्लेसीससनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्स