Join us

Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका

MS Dhoni Video, IPL 2024 RCB vs CSK: बेंगळुरूने चेन्नईचा केलेला पराभव धोनीच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:08 IST

Open in App

MS Dhoni left stadium without shaking hands, Video: क्रिकेटमध्ये जय-पराजय होतच असतो. खुद्द धोनीला या गोष्टींचा अनुभव अनेक वेळा आलेला आहे. दडपणाच्या परिस्थितीत स्वतःला कसे सावरावे याचे उदाहरण धोनीने मैदानावर अनेकदा दाखवून दिले आहे. पण, RCB विरुद्धच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी स्वत:च मनातून तुटलेला दिसला. CSK प्लेऑफ मध्ये न पोहोचल्याचं दु:ख केवळ त्याच्या चेहऱ्यावरच नाही तर त्याच्या हावभावांमध्येही स्पष्ट दिसत होते. याचदरम्यान, धोनीने चक्क RCBच्या खेळाडूंशी हस्तांदोलनही केले नसल्याचा दावा एका व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

RCBने अटीतटीच्या लढतीत CSKला पराभूत केले. त्यासोबतच CSKला स्पर्धेतूनही पॅक-अप करावे लागले. पराभव झाल्यानंतर धोनीने जे केले ती गोष्ट चकित करणारी होती. RCB विरुद्धच्या सामन्यातून धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो RCBच्या संघाशी हस्तांदोलन करण्यासाठी रांगेत सर्वात पुढे उभा राहिला होता, पण हस्तांदोलन करण्याची वेळ जवळ येताच त्याने रांग सोडून मैदानातून काढता पाय घेतला. प्रतिस्पर्ध्याचा नेहमी आदर करणाऱ्या धोनीने यापूर्वी असे कृत्य केल्याचे क्वचितच कुणाला आठवत असेल. अशा परिस्थितीत तो चिन्नास्वामी स्टेडियममधून अशाप्रकारे निघून गेल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे.

----

धोनीकडून अशा वागण्याची अपेक्षा कुणालाच नव्हती. त्याने हे कृत्य केल्याने सोशल मीडियावर त्याचा निषेध केला जात आहे. काहींनी धोनीच्या या वागण्यावर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला.

टॅग्स :आयपीएल २०२४महेंद्रसिंग धोनीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्ससोशल मीडिया