विराट कोहलीचा 'आठवा'वा प्रताप! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले विक्रमी शतक 

विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसि यांच्या १२५ धावांच्या सलामीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 08:58 PM2024-04-06T20:58:17+5:302024-04-06T21:03:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Virat kohli smashed 8th century in IPL with 67 balls | विराट कोहलीचा 'आठवा'वा प्रताप! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले विक्रमी शतक 

विराट कोहलीचा 'आठवा'वा प्रताप! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले विक्रमी शतक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसि यांच्या १२५ धावांच्या सलामीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. युझवेंद्र चहलने RR ला विकेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु एकाच षटकात विराट व फॅफचे झेल टाकले गेल्याने RCB ला मोठा दिलासा मिळाला. विराटने ६७ चेंडूंत आयपीएलमधील ८वे शतक झळकावले. 

विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्... 


राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले.  विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला पॉवर प्लेत ५३ धावा उभारून दिल्या. विराटने आक्रमक फटकेबाजी केली, तेच फॅफ संयमी खेळ करताना दिसला. आयपीएलमध्ये सर्वाधिक ७५०० धावा करणारा विराट पहिला फलंदाज ठरला. त्याच्यानंतर शिखर धवनच्या ६७५५ धावा आहेत.  डेव्हिड वॉर्नर ( ६५४५), रोहित शर्मा ( ६२८०), सुरेश रैना ( ५५२८) यांचा क्रमांक नंतर येतो.  फॅफनेही हळुहळू हात मोकळे केले आणि संघाला पहिल्या १० षटकांत बिनबाद ८८ धावांपर्यंत पोहोचवले. 


विराटने ३९ चेंडूंत आयपीएलच्या या पर्वातील तिसरे अर्धशतक झळकावताना फॅफसह १२ षटकांत शतकी धावा उभ्या केल्या. विराट व फॅफ यांची २०२२ नंतरची ही सहावी शतकी भागीदारी ठरली. १४व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर विराटचा पॉईंटवर नांद्रे बर्गरने झेल टाकला. त्याच षटकात फॅफचा सोपा झेल ट्रेंट बोल्टने टाकला. मात्र, पुढच्या चेंडूवर जॉस बटलरने झेल घेऊन १२५ धावांची ही भागीदारी तोडली. फॅफ ३३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल ( १) पुन्हा फेल गेला आणि नांद्रे बर्गरने त्याचा त्रिफळा उडवला. 


चहलने सामन्यातील दुसरी विकेट घेताना पदार्पणवीर सौरव चौहानला ( ९)  बाद केले. पण, विराटने पुढच्या चेंडूवर चहलचे षटकाराने स्वागत केले. विराटने ६७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने आयपीएलमधील आठवे शतक झळकावले. 
 

Web Title: IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Virat kohli smashed 8th century in IPL with 67 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.