Join us  

What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video 

जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांच्या वेगवान माऱ्यासमोर पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:06 PM

Open in App

IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांच्या वेगवान माऱ्यासमोर पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. बुमराहने भन्नाट यॉर्करवर पंजाबच्या फलंदाजाचे तिन्ही त्रिफळे उडाले. त्यांची अवस्था ४ बाद १७ अशी झाली. 

रोहित शर्मासाठी 'गायत्री'ची खास इस्टा स्टोरी! तुम्ही तिला विसरला असाल पण, हिटमॅन..

रोहित शर्मा ( ३६) आणि सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीनंतर पंजाब किंग्सने सामन्यात चांगले पुनरागमन केले होते. तिसऱ्या षटकात इशान किशनची विकेट ( ८) पडल्यानंतर सूर्यकुमार व रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ चेंडूंत ८१ धावा जोडल्या.  रोहितच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती संथ करण्यात पंजाबच्या गोलंदाजांना यश आले. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या.  हार्दिक पांड्या ( १०) अपयशी ठरला.  तिलक वर्मा व टीम डेव्हिडने ( १४) चांगली फटकेबाजी करून मुंबईला ७ बाद १९२ धावांपर्यंत पोहोचवले. तिलक १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. PBKS कडून हर्षल पटेलने ३, तर सॅम कुरनने २ विकेट्स घेतल्या.

शिखर धवनच्या गैरहजेरीत पंजाबी सुरुवात पुन्हा एकदा निराशानजक झाली. कर्णधार सॅम कुरन ( ६) सलामीला आला, परंतु जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात त्याची विकेट घेतली. दुसऱ्या बाजूने गेराल्ड कोएत्झीने PBKSच्या प्रभसिमरन सिंग ( ०) व लिएम लिव्हिंगस्टन ( १) यांच्या विकेट्स घेतल्या. जॉनी बेअरस्टोच्या जागी संधी मिळालेल्या रिली रोसूव (०) याचा भन्नाट यॉर्करवर बुमराहने त्रिफळा उडवला. पंजाबचे ४ फलंदाज १४ धावांत माघारी परतले. 

टॅग्स :आयपीएल २०२४जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सपंजाब किंग्स