रोहित शर्मासाठी 'गायत्री'ची खास इस्टा स्टोरी! तुम्ही तिला विसरला असाल पण, हिटमॅन..

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच जेतेपद जिंकली आहेत. पण, यंदाच्या पर्वात रोहितकडून हार्दिक पांड्याकडे MI च्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवली गेली.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येण्यापूर्वी रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. तो संघाचा उप कर्णधारही होता आणि अॅडम गिलख्रिस्टसह त्याने संघाला जेतपदही जिंकून दिले होते. काल एका पॉडकास्टवर गिलख्रिस्ट व रोहित यांच्या गप्पा रंगल्या.

डेक्कन चार्जर्ससारखं थीम साँग आतापर्यंत कोणत्याच आयपीएल फ्रँचायझीला बनवता आलं नाही, असे काल रोहित म्हणाला आणि आज गायत्री रेड्डी भाटीयाने इंस्टास्टोरीवर रोहितची कमेंट पोस्ट केली.

गायत्री रेड्डी ( Gayatri Reddy) ही रोहित शर्माच्या आयपीएलमधील पहिल्या टीमची मालकीण आहे. २१ सप्टेंबद १९८६ मध्ये जन्मलेल्या गायत्रीला डेक्कन चार्जर्सची मालकीण म्हणून ओळख मिळाली. डेक्कन क्रोनिकलचे मालक टी वेंकटराम रेड्डी यांची ती कन्या

आयपीएल २००८मध्ये गायत्रीने डेक्कन चार्जर्स संघाची बांधणी करण्यात वडिलांना मदत केली. तिने खेळाडूंची निवड केली आणि सातत्याने ती संघासोबत असायची. तेव्हा तिच्या सुंदरतेची चर्चा रंगली होती.

गायत्री रेड्डीने लंडन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे आणि तिने B.Sc. honours in construction management ही पदवी मिळवली आहे. २०१३ पासून ती डेक्कन क्रॉनिकल वृत्तपत्राची संपादक म्हणून काम पाहतेय.

हैदराबाद फ्रँचायझी ही डेक्कन चार्जर्स म्हणून आयपीएलमध्ये खेळली. २००९मध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले.

रोहितने या संघाकडून हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. २०१२ मध्ये आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या फ्रँचायझीला निलंबित केले.