Join us  

सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक

तिलक वर्मा व टीम डेव्हिड यांनी शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 9:16 PM

Open in App

IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीनंतरही पंजाब किंग्सने सामन्यात चांगले पुनरागमन केले होते. गोलंदाजीत योग्य बदल अन् अचूक मारा करून पंजाब किंग्सने MI च्या धावगतीवर अंकुश ठेवले होते. सूर्याने अर्धशतक झळकावले, परंतु त्याचा स्ट्राईक रेट फारसा चांगला नव्हता. पण, तिलक वर्मा व टीम डेव्हिड यांनी शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. 

रोहित शर्माचा One Handed Six! हिटमॅनचा MI कडून मोठा विक्रम, पांड्याचं सेलिब्रेशन

तिसऱ्या षटकात इशान किशनची विकेट ( ८) पडल्यानंतर सूर्यकुमार यादव व रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ चेंडूंत ८१ धावा जोडून मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. इशानची विकेट ही कागिसो रबाडाची ट्वेंटी-२०तील २५० वी विकेट ठरली. रोहितने आयपीएलमध्ये ६५०० धावांचा पल्ला आज ओलांडला आणि असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला. हर्षल पटेलच्या स्लोव्हर चेंडूवर रोहितने एका हाताने उत्तुंग फटका खेचला अन् तो सीमापार गेला. पण, पुढच्या षटकात सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. 

रोहितच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती किंचितशी संथ करण्यात पंजाबच्या गोलंदाजांना यश आले. या खेळपट्टीवर अचूक मारा केल्यास फलंदाजांवर दडपण ठेवता येईल, हे पंजाबने हेरले आणि रोहित पेव्हेलियनच्या दिशेने जाताना मुंबईच्या फलंदाजांना काही सूचना करताना दिसला. मुंबईचे स्फोटक फलंदाजी करणारे फलंदाज असताना तिलक वर्माला पुढे पाठवले गेले. शेवटच्या ५ षठकांत सूर्याने हात मोकळे करताना रबाडाची धुलाई केली. तिलकनेही खणखणीत षटकार खेचून १६व्या षटकात १८ धावा पूर्ण मिळवल्या. सॅमने १७व्या षटकात सूर्याचे वादळ थंड केले आणि प्रभसिमरन सिंगने अविश्वसनीय झेल घेतला. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. 

हर्षल पटेलने संथ चेंडूवर हार्दिक पांड्याला ( १०) माघारी पाठवले.  तिलक वर्मा व टीम डेव्हिडने ( १४) चांगली फटकेबाजी करून मुंबईला ७ बाद १९२ धावांपर्यंत पोहोचवले.  हर्षल पटेलने २०व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. तिलक १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :आयपीएल २०२४रोहित शर्मामुंबई इंडियन्सपंजाब किंग्ससूर्यकुमार अशोक यादव