IPL 2024: डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video

David Miller IPL Team 2024: गुजरात टायटन्सच्या संघाने डेव्हिड मिलरच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 12:13 AM2024-03-23T00:13:11+5:302024-03-23T00:19:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 News Gujarat Titans players relive the wedding of David Miller and his wife Camilla Harris | IPL 2024: डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video

IPL 2024: डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 News: आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी जगभरातील स्टार क्रिकेटपटू सध्या भारतात आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ला सुरुवात झाली. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी सामना होणार आहे. हा बहुचर्चित सामना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. कारण दोन्हीही संघ प्रथमच नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या तर गुजरातच्या संघाची कमान शुबमन गिलकडे देण्यात आली आहे. या सामन्यापूर्वी गुजरातच्या शिलेदारांनी आपला सहकारी डेव्हिड मिलरला त्याच्या लग्नातील क्षण अनुभवण्याची संधी दिली. (David Miller Wife)

गुजरातच्या फ्रँचायझीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मिलर त्याची पत्नी कॅमिला हॅरिसला अंगठी घालताना दिसत आहे. त्यानंतर दोघे एकमेकांना मिठी मारून आनंद साजरा करतात. कर्णधार शुबमन गिल देखील फ्रेममध्ये पाहायला मिळत आहे.  

अलीकडेच डेव्हिड मिलरने प्रेयसी कॅमिला हॅरिससोबत सातफेरे घेतले. दोघेही मागील मोठ्या कालावधीपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचे लग्न केपटाउन येथे झाले. मिलरची पत्नी कॅमिला ही एक पोलो खेळाडू आहे. त्यांच्या लग्नात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे आजी माजी खेळाडू सहभागी झाले होते. 

मिलर अडकला विवाहबंधनात 
मिलर आणि कॅमिला दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या लग्न सोहळ्याला कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. कॅमिला हॅरिस एक खेळाडू म्हणून डेव्हिड मिलरच्या उंचीला उत्तम प्रकारे पूरक आहे, कारण कॅमिला स्वतः एक व्यावसायिक पोलो खेळाडू आहे. ती आयपीएल २०२३ मध्ये मिलर आणि गुजरात टायटन्सला चीअर करताना दिसली होती.

Web Title: IPL 2024 News Gujarat Titans players relive the wedding of David Miller and his wife Camilla Harris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.