Join us

Video : हव्या होत्या १० धावा, केल्या तीन ! जसप्रीत बुमराहच्या माऱ्यासमोर विराट कोहली पुन्हा 'दीन'

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 19:48 IST

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारताना प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. पियूष चावलाच्या जागी आज MI च्या ताफ्यात श्रेयस गोपाळ खेळणार आहेत. RCB च्या ताफ्यात ३ बदल केले गेले आहेत. विल जॅक, महिपाल लोम्रोर व वियजकुमार व्यैशाक यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. हार्दिकने पहिले षटक मोहम्मद नबीकडून टाकून घेतले आणि त्यावर फॅफ ड्यू प्लेसिस व विराट कोहली यांनी ७ धावा काढल्या. विराट कोहली यंदाच्या पर्वात ३०० हून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे, परंतु त्याला सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने RCB ला केवळ १ विजय मिळवता आला आहे. मागील सामन्यात विराटने शतक झळकावूनही बंगळुरुला जिंकता आले नव्हते. आज वानखेडेवर त्याच्या समर्थनात मोठा चाहता वर्ग मैदानावर उपस्थित होता. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्या षटकात MI ला मोठे यश मिळवून दिले. त्याने विराटला ( ३) यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती झेलबाद केले. आजच्या सामन्यात विराटने १० धावा केल्या असत्या तर तो ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला असता, पण आता त्याला प्रतीक्षा पाहावी लागेल. 

ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे खेळाडूख्रिस गेल - ४६३ सामने, १४५६२ धावाशोएब मलिक - ५४२ सामने, १३३६० धावाकिरॉन पोलार्ड - ६६० सामने, १२९०० धावाअॅलेक्स हेल्स - ४४९ सामने, १२३१९ धावाविराट कोहली - ३८२ सामने, १२३१३* धावा  

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीजसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर