Join us  

दे दना दन! एकच वादा सूर्या दादा! १७ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा विजय पक्का 

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी आज वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:03 PM

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi :  मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी आज वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्सनंतर MI चे फलंदाज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांवर तुटून पपडले. इशान किशनने आक्रमक सुरुवात करून ८.३ षटकांत संघाला शंभर धावा उभ्या करून दिल्या. त्यानंतर सूर्या दादा मैदानावर आला. सूर्यकुमार यादवने १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर बसवले. सूर्या १९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर बाद झाला. 

शाब्बास DK, वर्ल्ड कप खेलना है अभी! रोहित शर्माने Live Match मध्ये दिनेश कार्तिकला डिवचले

मुंबई इंडियन्सला इशान किशन व रोहित शर्मा यांनी स्फोटक सुरुवात करून दिली. इशानने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना RCB च्या गोलंदाजांना चोपले. MI  ने ८.३ षटकांत फलकावर १०० धावा चढवल्या. पण, त्याच षटकात ही भागीदारी तुटली. इशान ३४ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांवर विराटच्या हाती झेलबाद झाला. आकाश दीपने MI ला १०१ धावांवर पहिला धक्का दिला.   इशानच्या विकेटनंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवनेही हात मोकळे केले आणि आकाश दीपच्या षटकात त्याने ४,०,६,२,६,६ अशा २४ धावा चोपल्या. रोहितनेही विल जॅक्सच्या फिरकीवर फटकेबाजी सुरू केली, परंतु रिले टॉप्लीने अविश्वसनीय झेल घेत रोहितला माघारी पाठवले. हिटमॅनने २४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने मैदानावर येताच पहिला चेंडू सीमापार पाठवला. सूर्या RCB च्या गोलंदाजांना निर्दयीपणे चोपत होता आणि विराट व फॅफ चेंडू सीमापार जाताना नुसते पाहत उभे होते. सूर्याने १७ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. 

टॅग्स :आयपीएल 2018सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर