जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी! रजत पाटीदार, फॅफ ड्यू प्लेसिस, दिनेश कार्तिक यांची फटकेबाजी

विराट कोहलीची फटकेबाजी पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:28 PM2024-04-11T21:28:28+5:302024-04-11T21:32:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi :  RAJAT PATIDAR ( 50), Faf Du Plessis ( 61) & Dinesh Karthik ( 50*) , Five-fer to Jasprit Bumrah (4-0-21-5), Most 3 fers in IPL, RCB set 197 runs target to MI | जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी! रजत पाटीदार, फॅफ ड्यू प्लेसिस, दिनेश कार्तिक यांची फटकेबाजी

जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी! रजत पाटीदार, फॅफ ड्यू प्लेसिस, दिनेश कार्तिक यांची फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : विराट कोहलीची फटकेबाजी पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. जसप्रीत बुमराहने पुन्हा बाजी मारताना विराटला ( ३) माघारी पाठवले. पदार्पणवीर विल जॅक्सही फेल गेला. मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेतली असे वाटत असताना रजत पाटीदार व कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस मैदानावर उभे राहिले आणि दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. तरीही MI च्या गोलंदाजांनी अधुनमधून धक्के देण्याचे सत्र सुरू ठेवले होते. जसप्रीत बुमराहने आज पाच विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली. 

मुंबई इंडियन्सच्या 'डोक्याला' Shot! दिनेश कार्तिकच्या तिकडम फटकेबाजीने दिला ताप, Video 

विराट कोहली ( ३) व पदार्पणवीर विल जॅक्स ( ८) यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व आकाश मढवाल यांनी माघारी पाठवले. पण, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व रजत पाटीदार यांनी ८२ धावा जोडल्या. रजत २६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात वाचला.  फॅफने यंदाच्या पर्वातील पहिले अर्धशतक पूर्ण केले.  दिनेश कार्तिकने मढवालच्या षटकात यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून ४ चौकार मिळवले. कार्तिक व ड्यू प्लेसिस यांची २६ चेंडूंवरील ४५ धावांची भागीदारी जसप्रीतने तोडली. ४० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारासह ६१ धावा करणाऱ्या ड्यू प्लेसिसचा सुरेख झेल टीम डेव्हिडने टिपला.  
 


पुढच्याच चेंडूवर महिपाल लोम्रोरला ( ०) भन्नाट यॉर्कवर पायचीत करून बुमराहने सहावा धक्का दिला. सौरव चौहान इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर आला, परंतु बुमराहची हॅटट्रिक यॉर्कर टाकूनही पूर्ण होऊ शकली नाही. पण, पुढच्या षटकात बुमराहने त्याची ( ९) विकेट मिळवली. पुढच्या चेंडूंवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विजयकुमार व्याशकने विकेट टाकली आणि बुमराहची ही डावातील पाचवी विकेट ठरली. पुन्हा बुमराहची हॅटट्रिक हुकली. त्याने ४ षटकांत २१ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक २१ वेळा डावात ३ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम बुमराहने नावावर केला. कार्तिकने २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करून संघाला ८ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. 
 

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi :  RAJAT PATIDAR ( 50), Faf Du Plessis ( 61) & Dinesh Karthik ( 50*) , Five-fer to Jasprit Bumrah (4-0-21-5), Most 3 fers in IPL, RCB set 197 runs target to MI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.