मुंबई इंडियन्सच्या 'डोक्याला' Shot! दिनेश कार्तिकच्या तिकडम फटकेबाजीने दिला ताप, Video 

दिनेश कार्तिकच्या ( Dinesh Karthik) फटकेबाजीने MI च्या डोक्याला शॉट दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:15 PM2024-04-11T21:15:27+5:302024-04-11T21:15:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Dinesh Karthik hit 4 boundaries behind the keeper in a single over, Video  | मुंबई इंडियन्सच्या 'डोक्याला' Shot! दिनेश कार्तिकच्या तिकडम फटकेबाजीने दिला ताप, Video 

मुंबई इंडियन्सच्या 'डोक्याला' Shot! दिनेश कार्तिकच्या तिकडम फटकेबाजीने दिला ताप, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : विराट कोहलीची फटकेबाजी पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. फॅफ ड्यू प्लेसिस व रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांनी RCB ला सावरले. पण, जसप्रीत बुमराहने पुन्हा धक्के दिले. मात्र, दिनेश कार्तिकच्या ( Dinesh Karthik) फटकेबाजीने MI च्या डोक्याला शॉट दिला.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २३ धावांवर दोन धक्के दिल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ थोडा रिलॅक्स झाला. विराट कोहली ( ३) व पदार्पणवीर विल जॅक्स ( ८) यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व आकाश मढवाल यांनी माघारी पाठवले. जसप्रीतने आयपीएलमध्ये विराटला पाचव्यांदा बाद केले. पण, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व रजत पाटीदार यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ८२ धावा जोडल्या.  हार्दिकच्या पहिल्याच षटकात रजतने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराटही थक्क झाला. रजत २६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला आणि फॅफ ड्यू प्लेसिससह त्याची ८२ ( ४७ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. 
 


ग्लेन मॅक्सवेलने ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात वाचला. त्याची विकेट मिळवण्यासाठी श्रेयस गोपाळला आणण्याचा डाव यशस्वी ठरला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक १७ वेळा भोपळ्यावर बाद होण्याच्या दिनेश कार्तिक व रोहित शर्मा यांच्या नकोशा विक्रमाची मॅक्सवेलने बरोबरी केली. फॅफने यंदाच्या पर्वातील पहिले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ३३ चेंडू खेळले. दिनेश कार्तिकने मढवालच्या षटकात यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून ४ चौकार मिळवले. कार्तिक व ड्यू प्लेसिस यांची २६ चेंडूंवरील ४५ धावांची भागीदारी जसप्रीतने तोडली. ४० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारासह ६१ धावा करणाऱ्या ड्यू प्लेसिसचा सुरेख झेल टीम डेव्हिडने टिपला.  


 

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Dinesh Karthik hit 4 boundaries behind the keeper in a single over, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.