Join us

Video : मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला

MI vs RR Live Update : नेतृत्व बदलानंतर MI पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 19:06 IST

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स  ( MI vs RR ) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर ( Wankhede) सामना होतोय. नेतृत्व बदलानंतर MI पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) नेतृत्व सोपवणे हे रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. त्यामुळेच गुजरात व हैदराबाद येथे झालेल्या लढतीत हार्दिकला रोषाचा सामना करावा लागला. आता घरच्या मैदानावर परिस्थिती अशी असेल याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

स्टेडियमबाहेर तरी वातावरण रोहितमय झालेले दिसतेय... विक्रेतेही रोहितच्याच नावाची जर्सी विकताना दिसत आहेत आणि नो हार्दिक, ओन्ली रोहित... असाच सूर त्यांच्याकडून दिसतोय... चाहतेही रोहितच्या नावाची जर्सी घालून स्टेडियमच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे याही लढतीत हार्दिकविरोधात हूटिंग होईल, अशी शक्यता बळावली आहे. हार्दिकने खेळपट्टीची पाहणी केली, तर रोहित शॅडो बॅटींग करताना दिसला. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याचे झहीर खानने सांगितले आणि त्यामुळे आज चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.

कर्णधार म्हणून हार्दिकचा हा पन्नासावा आयपीएल सामना आहे, तर राजस्थान रॉयल्सच्या आर अश्विन आज दोनशेवा आयपीएल सामना खेळणार आहे. स्टेडियमवर रोहितच्या नावाचाच गजर होताना दिसला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संदीप शर्मा दुखापतीमुळे आज राजस्थानकडून खेळणार नाही. टीव्ही प्रेझेंटर संजय मांजरेकर यांनी जेव्हा हार्दिकसाठी चाहत्यांना चिअर करण्याचे आवाहन केले, तेव्हा त्यांच्याकडून हूटिंग केले गेले. संपूर्ण स्टेडियमवर रोहितचे नावच दणाणले होते आणि प्रेक्षकांची वागणूक पाहून हार्दिकचा चेहरा पडलेला दिसला.

टॅग्स :आयपीएल २०२४हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स