What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 04:28 PM2024-04-07T16:28:45+5:302024-04-07T16:29:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : WHAT A CATCH BY AXAR Patel, Ishan Kishan departs after blazing 42, MI 111/3 in 10.2 overs vs DC, Video | What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलने दोघांनाही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर माघारी पाठवले. इशानने मारलेला खणखणीत फटक्यावर वीजेच्या वेगाने आलेला चेंडू अक्षरने स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून पद्धतीने टिपला. 

रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम


दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनाने मुंबई इंडियन्सचा उत्साह वाढला होता. त्यात रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी MI ला दमदार सुरुवात करून दिली. इशाननेही ट्वेंटी-२०त ४५०० धावांचा टप्पा आज ओलांडला. रोहितने झाय रिचर्डसनला मारलेले दोन खणखणीत षटकार पाहण्यासारखे होते. त्याने या फटकेबाजीसह आयपीएलमध्ये DC विरुद्ध १००० धावांचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला, परंतु शिखर धवन व विराट कोहली यांच्यानंतर दोन संघाविरुद्ध असा पराक्रम रोहितने करून दाखवला. रोहित २७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. इशानसह ८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. 


सूर्याची उत्सुकतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांचा हिरमोड झाला. एनरिच नॉर्खियाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्या शून्यावर बाद झाला. इशान चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि ११व्या षटकात त्याने अक्षर पटेलचे खणखणीत षटकाराने स्वागत केले. पण पुढच्याच चेंडूवर अक्षरने अविश्वसनीय झेल घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. इशान २३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर कॉट अँड बोल्ड झाला. तिलक वर्माही ( ६) लगेच माघारी परतला. 

Web Title: IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : WHAT A CATCH BY AXAR Patel, Ishan Kishan departs after blazing 42, MI 111/3 in 10.2 overs vs DC, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.