Join us  

रोहित, इशानचा सूसाट खेळ; पण सूर्या फेल! हार्दिक, डेव्हिड मदतीला धावले, २०० पार नेले

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : रोहित शर्मा व इशान किशन यांनी वादळी फटकेबाजी करून ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 5:12 PM

Open in App

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : रोहित शर्मा व इशान किशन यांनी वादळी फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सला सुरुवात चांगली करून दिली. पण, दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी विशेषतः अक्षर पटेलने सामन्यावर पकड मिळवून दिली. अक्षरने MI च्या दोन्ही सलामीवीरांना अर्धशतकांच्या उंबरठ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी निराश केले. कर्णधार हार्दिक पांड्याने धीर दिला. त्याला टीम डेव्हिडची साथ मिळाली. 

What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलने दोघांनाही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर माघारी पाठवले. रोहित २७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. इशानसह ८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. सूर्याकुमार यादवने आज पुनरागमनाच्या सामन्यात निराश केले. एनरिच नॉर्खियाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्या शून्यावर बाद झाला. इशान चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि ११व्या षटकात त्याने अक्षर पटेलचे खणखणीत षटकाराने स्वागत केले. पण पुढच्याच चेंडूवर अक्षरने अविश्वसनीय झेल घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. इशान २३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर कॉट अँड बोल्ड झाला.   तिलक वर्माने ( ६) मोठी खेळी करण्याची संधी गमावली. खलील अहमदने ही विकेट मिळवली. इशानच्या विकेटनंतर मुंबईला दोन धक्के देत दिल्लीने सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार हार्दिक पांड्या याने पुन्हा एकदा मुंबईला आशेचा किरण दाखवला, परंतु दिल्लीचे क्षेत्ररक्षण जबरदस्त झालेले दिसले. हार्दिकला पाचव्या विकेटसाठी टीम डेव्हिडची साथ मिळाली आणि दोघांनी ६० धावांची भागीदारी केली. हार्दिक ३९ धावांवर नॉर्खियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. दिल्लीच्या गोलंदाजांनी शेवटच्या ३ षटकांत भरपूर अतिरिक्त धावा दिल्या. नॉर्खियाने टाकलेले १८वे षटक १० चेंडूंचे राहिले. 

डेव्हिड २१ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. रोमारिओ शेफर्डने १० चेंडूंत ३९ धावा कुटल्या आणि मुंबईला ५ बाद २३४ धावांपर्यंत पोहोचवले. नॉर्खियाच्या शेवटच्या षटकात शेफर्डने ३२ धावा कुटल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सहार्दिक जोशी