Join us  

ज्यु. मलिंगाने ३ चेंडूंत मुंबई इंडियन्सला हादरे दिले; रहमानच्या अविश्वसनीय झेलने सर्वांना गप्प केले

मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला सडेतोड उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:35 PM

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला सडेतोड उत्तर दिले. इशान किशन व रोहित शर्मा यांनी १०च्या सरासरीने फटकेबाजी करताना CSK चा चांगला समाचार घेतला. पण, महिशा पथिराणाने एकाच षटकात दोन धक्के दिले. त्यात सूर्यकुमार यादव याचा अफलातून झेल घेऊन मुस्ताफिजूर रहमानने वानखेडे स्टेडियमला शांत केले. 

MS Dhoni, एक ही दिल कितनी बार जीतोगे? ५ रेकॉर्ड नोंदवले अन् चाहतीला दिले स्पेशल गिफ्ट

MS Dhoni ने  मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ४ चेंडूवर ५००च्या स्ट्राईक रेटने फटके खेचून वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. We want Dhoni... असा नारा घुमत असताना डॅरिल मिचेल २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला अन् वानखेडेवर माही नामाचा नाद दुमदुमला... त्याने चाहत्यांना निराश नाही केले आणि ६,६,६,२ अशी फटकेबाजी केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा कुटल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. धोनीने ४ चेंडूंत २० धावा चोपल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. 

इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला अपेक्षित आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी ७ षटकांत ७० धावा जोडल्या. मथिशा पथिराणाने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशानला ( २३) माघारी पाठवून CSK ला यश मिळवून दिले. त्याच षटकात पथिराणाच्या बाऊन्सरवर सूर्यकुमार यादवने अपर कट मारला खरा, परंतु मुस्ताफिजूर रहमानने चतुराईने झेल टिपला. चेंडू टिपल्यानंतर तोल सीमापार जातोय याचा अंदाज येताच रहमानने चेंडू हवेत फेकला अन् बाहेर जाऊन पुन्हा आत येत सुरेख झेल घेतला. सूर्या शून्यावर माघारी परतला.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्ससूर्यकुमार अशोक यादव