Join us  

हार्दिक पांड्यावर टीकेची झोड! सिद्धू यांनी मुंबईच्या कर्णधाराला दिला मोलाचा सल्ला

Hardik Pandya Troll: मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 6:08 PM

Open in App

IPL 2024 Mumbai Indians: नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक सुरुवात झाली. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सुरुवातीच्या आपल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते संतप्त असून ते हार्दिकला लक्ष्य करत आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये चाहत्यांचा रोष पाहायला मिळाला. यानंतर अभिनेता सोनू सूद, आर अश्विन आणि आता माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्दधू यांनी पांड्याच्या समर्थनार्थ भाष्य केले आहे. (IPL 2024 News)

मुंबईने आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामना खेळला. या सामन्यात यजमानांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. पण, नाणेफेकीवेळी घडलेली घटना खेळभावनेला दुखावणारी ठरली. खरं तर झाले असे की, मुंबईचा कर्णधार हार्दिक नाणेफेकीसाठी आला असता प्रेंझेंटेटर संजय मांजरेकर यांनी हार्दिकला चीअर करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केले पण प्रेक्षकांनी दुर्लक्ष करत 'रोहित रोहित' अशा घोषणा दिल्या.   हार्दिकवर टीकेची झोडनवज्योतसिंग सिद्दधू यांनी हार्दिकच्या ट्रोलिंगवर म्हटले की, मुंबई इंडियन्सने शेवटचे दोन सामने जिंकले असते तर सगळेच (चाहते) गप्प झाले असते. हार्दिक पांड्याने टीकाकारांकडे दुर्लक्ष करून संघातील कॉम्बिनेशनवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. संघाने २७७ धावा दिल्यामुळे प्रत्येकजण त्यांच्यावर खराब गोलंदाजीचा शिक्का मारत आहे. मात्र, त्या आधीच्या सामन्यात गुजरातने मुंबईविरूद्ध निसटता विजय मिळवला. तेव्हा मुंबईचा पराभव झाला पण यावरून कोणाची बदनामी झाली नाही. सिद्धू 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलत होते. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला. 

टॅग्स :नवज्योतसिंग सिद्धूहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सट्रोलआयपीएल २०२४