Join us

बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांना हात मोकळे करू दिले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 20:16 IST

Open in App

IPL 2024, MI vs SRH  Live Marathi  : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांना हात मोकळे करू दिले नाही. नुवान तुषारा आणि पदार्पणवीर अंशुल कंबोज यांनी चांगला मारा केला. कंबोजने SRHच्या ट्रॅव्हिस हेडचे त्रिफळे उडवले होते, परंतु तो चेंडू नो बॉल ठरला. पण, जसप्रीत बुमराह अशी संधी फार कमी देतो. त्याने अभिषेक शर्माला माघारी पाठवून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. जसप्रीतचा मुलगा अंगद हा आज स्टेडियमवर दिसला.

मुंबई इंडियन्सला ११ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवता आले आहेत. आज त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे, जे १० सामन्यांत ६ विजय मिळवून चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.   MI चा गेराल्ड कोएत्झी आज खेळणार नाही, परंतु २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अंशुल कंबोज याला (Anshul Kamboj) पदार्पणाची संधी दिली. पहिल्याच षटकात दोन्ही संघांनी वाईड चेंडूसाठी प्रत्येकी १ रिव्ह्यू घेतला. MI चा रिव्ह्यू यशस्वी ठरला, पण SRH ने गमावला. मुंबई आज प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम डेव्हिड व नुवान तुषारा या दोन परदेशी खेळाडूंसह खेळत आहेत. २०२२ मध्येही मुंबईने RCB विरुद्ध किरॉन पोलार्ड व डेवॉल्ड ब्रेव्हिस या दोनच परदेशी खेळाडूंना खेळवले होते.  तिसऱ्या षटकात तुषाराच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड थोडक्यात वाचला, चेंडू अगदी स्टम्पच्या जवळून गेला. त्यात अंशुल कंबोजने अप्रतिम चेंडूवर हेडचा त्रिफळा उडवला, परंतु नो बॉलने SRH च्या फलंदाजाला पुन्हा जीवदान मिळाले. 

पण, SRH वर दडपण निर्माण झाले होते आणि जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला.  जसप्रीत १५ मार्च २०२१ ला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेसन हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला आणि ४ सप्टेंबर २०२३ मध्ये त्याच्या घरी पाळणा हलला. जसप्रीत व संजना यांनी मुलाचे नाव अंगद ठेवले आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२४जसप्रित बुमराहसंजना गणेशनमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद