IPL 2024, MI vs KKR Marathi Live :  इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज कोलकाताच्या इडन गार्डनवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होत आहे. आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी KKR ला फक्त १ विजय हवा आहे, तेच MI आधीच स्पर्धेतून बाद झाले आहेत. कोलकाताने ११ सामन्यांत ८ विजय मिळवले आहेत आणि १६ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. मुसळधार पावसाने दोन्ही संघांची चिंता वाढवली होती. २०२३ आणि २०२४ या कालावधीत मुंबई इंडियन्सला प्रतिस्पर्धीच्या मैदानांवर १३ पैकी ९ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सुनील नरीनने २५ सामन्यांत १० वेळा बाद केले आहे.  
कोलकाता आणि मुंबई यांच्यात झालेल्या ३३ सामन्यांपैकी २३ मुंबईने जिंकले आहेत. इशान किशनला आयपीएलमध्ये २५० चौकार पूर्ण करण्यासाठी एक चेंडू सीमापार पाठवावा लागेल, तर टीम डेव्हिडला षटकारांचे अर्धशतक करण्यासाठी एक षटकार खेचावे लागेल. मिचेल स्टार्कने ४ विकेट्स घेताच तो आयपीएलमध्ये पन्नास बळी पूर्ण करेल. आंद्रे रसेलला आयपीएलमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ४० धावा हव्या आहेत. पावसामुळे KKR vs MI सामना सुरू होण्यास विलंब झाला. साधारण ७.४५च्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. ८ वाजता कव्हर काढण्यात आले आणि रेफरींकडून खेळपट्टीची पाहणी केली गेली. ८.४५ ला खेळपट्टीची पाहणी केली गेली. ९ वाजता टॉस होऊन सव्वानऊ वाजता मॅच  सुरू होईल, परंतु दोन्ही संघाना प्रत्येकी १६-१६ षटके खेळायला मिळतील.