Join us

IPL 2024 MI vs DC: लय भारी! जसप्रीत बुमराहनं इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला

Jasprit Bumrah News: आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 20:24 IST

Open in App

IPL 2024 MI vs DC Match: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील विसाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ भिडले. दिल्ली कॅपिटल्सला नमवून यजमान मुंबईने विजयाचे खाते उघडले. आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah IPL Wickets) या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मुंबईने २३५ धावांचा बचाव करताना विजय संपादन केला अन् २ गुण मिळवले. जसप्रीत बुमराहने दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला अप्रतिम यॉर्करवर बाहेरचा रस्ता दाखवला. तो ४० चेंडूत ६६ धावांची खेळी करून तंबूत परतला. (IPL 2024 News) 

त्यानंतर यॉर्कर किंगने अभिषेक पोरेलला बाद करून पाहुण्या संघाला आणखी एक धक्का दिला. अभिषेक ३१ चेंडूत ४१ धावा करून माघारी परतला. ३० वर्षीय बुमराहने त्याच्या ४ षटकांत २२ धावा देत २ बळी घेतले. अभिषेक पोरेलला बाद करताच बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली. या बळीसह तो आयपीएलमध्ये लसिंथ मलिंगानंतर मुंबईसाठी १५० बळी घेणारा गोलंदाज ठरला. आयपीएच्या इतिहासात एका संघासाठी १५० बळी घेणारा बुमराह तिसरा खेळाडू ठरला. या यादीत लसिथ मलिंगा आणि सुनील नरेन यांचा देखील समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे एका संघासाठी १५० बळी घेणारा बुमराह पहिला भारतीय शिलेदार ठरला आहे. 

IPL मध्ये एका संघासाठी सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू -

  1. लसिथ मलिंगा - मुंबई इंडियन्स (१७० बळी)
  2. सुनील नरेन - केकेआर (१६६ बळी)
  3. जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्स (१५० बळी)

IPL मध्ये एका संघासाठी १५० बळी घेणारे भारतीय -

  1. जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्स (१५० बळी)
  2. भुवनेश्वर कुमार - सनरायझर्स हैदराबाद (१४७ बळी)
  3. युझवेंद्र चहल - आरसीबी (१३९ बळी)
  4. हरभजन सिंग - मुंबई इंडियन्स (१२७ बळी) 
  5. रवींद्र जडेजा - सीएसके (१२६ बळी)

IPL मध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज -

  1. भुवनेश्वर कुमार - १७० बळी
  2. जसप्रीत बुमराह - १५० बळी
  3. उमेश यादव - १४० बळी
  4. मोहम्मद शमी - १२७ बळी 
  5. मोहित शर्मा - १२६ बळी 
टॅग्स :जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सआयपीएल २०२४