Join us

Toss उडवण्यापूर्वी श्रेयस अय्यरने केलं असं काही, लोकेश राहुलच्या डोळ्यांदेखत घडलं अन्... Video 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पुन्हा एकदा Toss ची चर्चा रंगताना दिसतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 19:33 IST

Open in App

IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पुन्हा एकदा Toss ची चर्चा रंगताना दिसतेय... मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या लढतीत सामनाधिकाऱ्यांनी MI च्या फेव्हरमध्ये टॉसशी छेडछानी केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल केला गेला होता. त्यात आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातल्या सामन्यानंतर पुन्हा Toss ची चर्चा रंगली आहे. KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने टॉससाठीच्या नाण्यासोबत LSG चा कर्णधार लोकेश राहुल याच्या डोळ्यांदेखत असं काहीतरी केलं ज्याने... 

KKR ने ८ विकेट्स राखून LSG चा पराभव केला आणि  ८ गुणांसह त्यांची दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत झाली आहे. LSG चा सहा सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. KKR च्या गोलंदाजांनी चांगला मारा करून LSG च्या धावांवर अंकुश ठेवला होता. मिचेल ४ षटकांत २८ धावांसह तीन विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा, सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेऊन LSG ला दडपणात राखले होते. पण, निकोलस पूरनने ते झुगारले आणि ३२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावा केल्या. LSG कडून कर्णधार लोकेश राहुल ( ३९) व आयुष बदोनी ( २९) यांनी त्यानंतर सर्वाधिक धावा केल्या. लखनौला ७ बाद १६१ धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. 

KKR कडून फिल सॉल्ट व श्रेयस अय्यर यांनी मॅच विनिंग भागीदारी केली.  श्रेयसने नाबाद ३८ धावा केल्या आणि संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला. सॉल्ट ४७ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह ८९ धावांवर नाबाद राहिला. कोलकाताने १५.४ षटकांत २ बाद १६२ धावा करून सामना जिंकला. दरम्यान, या सामन्याच्या टॉसच्या वेळी जेव्हा मॅच रेफरींनी टॉस अय्यरच्या हाती दिला तेव्हा त्याने त्याला किस केलं अन् मग हवेत फेकला. याआधीच्या सामन्यातही श्रेयसने असं केलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने ते दोन्ही सामने जिंकले. आता याला विश्वास म्हणा की काही आणखी, पण श्रेयसच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.  

टॅग्स :आयपीएल २०२४श्रेयस अय्यरकोलकाता नाईट रायडर्सलखनौ सुपर जायंट्स