Join us

समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

स्टार्कने ३-०-२२-३ अशी गोलंदाजी करून पॉवर प्लेमध्ये SRH ला चार धक्के दिले आणि कदाचीत स्टार्कला आणखी एक विकेट मिळाली असती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 20:36 IST

Open in App

IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi :  मिचेल स्टार्कने ( MITCHELL STARC ) ने आज भन्नाट गोलंदाजी केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजाने पहिल्या स्पेलमध्येच सनरायझर्स हैदराबादचे धाबे दणाणून टाकले. स्टार्कने ३-०-२२-३ अशी गोलंदाजी करून पॉवर प्लेमध्ये SRH ला चार धक्के दिले आणि कदाचीत स्टार्कला आणखी एक विकेट मिळाली असती. पण, राहुल त्रिपाठीला ( Rahul Tripathi) अम्पायरने नाबाद दिले आणि हैदराबादच्या याच फलंदाजाने KKR ची डोकेदुखी वाढवली. त्याने वैयक्तिक अर्धशतक झळकावताना संघाल शतकपार पोहोचवले. 

मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स

२४.७५ कोटींचा गोलंदाज मिचेल स्टार्क याने KKR ला स्वप्नवत सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकात SRH चा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवल्यानंतर पाचव्या षटकात नितीश रेड्डी ( ९) व शाहबाज अहमद ( ०) यांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवले. वैभव अरोराने दुसऱ्या षटकात हैदराबादचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माला ( ३) बाद करून संघाला मजबूत पकड मिळवून दिली.  आंद्रे रसेलने हवेत झेपावत सुरेख टिपला. 

 इथे मिळाली असती राहुलची विकेट, पण... तिसऱ्या षटकात स्टार्कने भन्नाट यॉर्कर टाकला होता आणि राहुल त्रिपाठीच्या बुटाला लागून तो बॅटवर आदळला. स्टार्क व श्रेयस अय्यर तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागायची का नाही, या संभ्रमात दिसले. पण, त्यांनी DRS घेतला असता तर ही विकेटही मिळाली असती. पॉवर प्लेमध्ये हैदराबादची अवस्था ४ बाद ४५ अशी दयनीय झाली होती.  

जीवदान मिळालेला त्रिपाठी KKR वर भारी पडताना दिसला. त्याने हेनरिच क्लासेनसोबत २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ३७ चेंडूंत ६२ धावांची ही भागीदारी वरुण चक्रवर्थीने तोडली. त्याच्या षटकात ९ धावा आल्या असूनही क्लासेनने मोठा फटका मारला आणि सीमारेषेवर रिंकू सिंगने सहज झेल टिपला. क्लासेन २१ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर बाद झाला.   

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद