Join us

Video: सामना संपल्यावर शाहरुख मैदानात आला अन् 'त्या' कृतीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं

Shahrukh Khan Video, IPL 2024: शाहरुख खानने मैदानात एन्ट्री घेतल्यानंतर खेळाडूंची भेट घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी हा प्रकार घडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 10:55 IST

Open in App

Shahrukh Khan Rishabh Pant Video, IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्ससाठी बुधवारचा दिवस खूपच खास ठरला. कोलकाताच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. कोलकाताचा सलामीवीर सुनील नारायण याच्या ३९ चेंडूत ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ७ बाद २७२ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना, दिल्लीच्या संघाला मात्र १७.२ षटकेच खेळता आली. त्यात त्यांनी १६६ धावा केल्या आणि तब्बल १०३ धावांनी सामना गमावला. सामना संपल्यावर KKRचा सहमालक बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान मैदानात आला आणि त्याने केलेल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली.

सामना संपल्यानंतर शाहरुख खान मैदानात उतरला. शाहरुख खानने केकेआरच्या प्रत्येक खेळाडूला मिठी मारली. या विजयासाठी त्याने कर्णधार श्रेयस अय्यर, मार्गदर्शक गौतम गंभीर, रिंकू सिंग आणि युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी यांचे अभिनंदन केले. शाहरुखने केवळ आपल्याच खेळाडूंवर प्रेमाचा वर्षाव केला नाही तर तो दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनाही भेटला. विशेषतः तो रिषभ पंतशी बराच वेळ बोलला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ सामना हरला पण या फलंदाजाने अप्रतिम अर्धशतक झळकावले आणि त्याबद्दल शाहरुख खान त्याचे अभिनंदन करताना दिसला. त्याच्या या कृतीने त्याने चाहत्यांची मने जिंकली.

याशिवाय, शाहरुखने पूर्वी KKRमध्ये असलेला आणि आता दिल्लीकडून खेळणारा कुलदीप यादवला मिठी मारत त्याच्याशी मजा मस्ती केली. अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला मिठी मारून त्याच्याशी संवाद साधला. पृथ्वी शॉ ची देखील गळाभेट घेतली. तसेच, जर्सीवर स्वाक्षरीदेखील केली. याशिवाय त्याने स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही अभिवादन केले.

टॅग्स :आयपीएल २०२४शाहरुख खानकोलकाता नाईट रायडर्सरिषभ पंतगौतम गंभीर