IPL 2024 KKR vs SRH Final : मागील दोन महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग २०२४चं आणखी एक यशस्वी पर्व आज संपणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नईत अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर व पॅट कमिन्स या दोन्ही कर्णधारांचं फोटोशूट झालं आणि यामध्ये दोघांमध्ये मजेशीर संवाद पाहायला मिळाला.
KKR चौथ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे आणि त्यांनी २०१२ व २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे SRH तिसरी फायनल खेळणार आहे आणि २०१६ मध्ये त्यांनी बाजी मारली होती. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केले होते. कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर १ मध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. SRH ने क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला.
आयपीएल विजेत्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रूपये दिले जातात. उपविजेत्या संघाला १३ कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाईल. तिसऱ्या स्थानावरील संघाला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावर असलेला संघ ६.५ कोटी रूपये जिंकेल. ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला १५ लाख रूपये मिळतील. विराट कोहली या शर्यतीत आघाडीवर आहे. स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअरला २० लाख आणि मोस्ट व्हॅल्युएबल ठरणाऱ्या शिलेदाराला १२ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल.