Join us

IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती

IPL 2024 DC vs MI Live Match Updates: आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:04 IST

Open in App

IPL 2024 DC vs MI Live Match Updates In Marathi | नवी दिल्ली: आज भारताची राजधानी विरूद्ध आर्थिक राजधानी असा सामना होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ४३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. दिल्ली गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई ९व्या क्रमांकावर आहे. दोन्हीही संघ सुरुवातीपासून संघर्ष करत आले आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्हीही संघांना विजयाच्या पटरीवर कायम राहावे लागणार आहे. नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना होत आहे. आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IPL 2024 News)

हार्दिकने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीचा कर्णधार रिषभने या निर्णयाचे स्वागत करत आम्हाला देखील प्रथम फलंदाजी करायची होती, असे सांगितले. मुंबईच्या संघात लूक वुडचे पुनरागमन झाले असून गेराल्ड कोएत्झीला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे, तर दिल्लीने पृथ्वी शॉला वगळले आहे, त्याच्या जागी कुमार कुशाग्रला संधी मिळाली. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीने नऊपैकी चार सामने जिंकून आठ गुण मिळवले आहेत. तर मुंबईला आठपैकी केवळ तीन सामने जिंकण्यात यश आले आहे. 

मुंबईचा संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा. 

दिल्लीचा संघ - रिषभ पंत (कर्णधार), जेक फ्रेजर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिजाद विलियम्स, मुकेश कुमार, खलील अहमद. 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या