८ चेंडूंत ३ विकेट्स! MS Dhoni ने फिल्डिंग लावली, रवींद्र जडेजाने मॅच फिरवली, Video
८ चेंडूंत ३ विकेट्स! MS Dhoni ने फिल्डिंग लावली, रवींद्र जडेजाने मॅच फिरवली, Video
फिल सॉल्ट व सुनील नरीन या जोडीने यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारी फटकेबाजी केली आहे. पण, आज तुषार देशपांडेने पहिल्याच चेंडूवर KKR ला धक्का दिला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 20:25 IST
८ चेंडूंत ३ विकेट्स! MS Dhoni ने फिल्डिंग लावली, रवींद्र जडेजाने मॅच फिरवली, Video
IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पर्वात आतापर्यंत सर्वात स्फोटक सलामीवीर असलेल्या KKR ची आज संथ सुरुवात झाली. चेपॉकच्या खेळपट्टीवर CSK च्या तुषार देशपांडेने पहिल्याच चेंडूवर धक्का दिला. त्यानंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja ) ८ चेंडूंत ३ विकेट्स घेताना KKR ला बॅकफूटवर फेकले. सुनील नरीनला रोखण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने फिल्डिंगमध्ये केलेले बदल यशस्वी ठरले.
CSKने टॉस जिंकून जिंकून KKR ला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. फिल सॉल्ट व सुनील नरीन या जोडीने यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारी फटकेबाजी केली आहे. पण, आज तुषार देशपांडेने पहिल्याच चेंडूवर KKR ला धक्का दिला. सॉल्टचा पॉईंटवर रवींद्र जडेजाने सुरेख झेल टिपला. मागील सामना गाजवणारा अंगकृष रघुवंशीने संयमी खेळ करताना सुनील नरीनला साथ दिली. नरीनचा उजवा खांदा दुखावला गेल्याचे दिसले, तरीही त्याने उत्तुंग फटकेबाजी केली. अंगकृषने पहिलाच सामना खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरचे चौकाराने स्वागत केले. नरीननेही सुरेख स्ट्रेट ड्राईव्हवर चौकार मिळवला. रघुवंशी व नरीन यांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे CSK ला गोलंदाजीत बदल करावा लागत होता. सातव्या षटकातील बदल CSKच्या पथ्यावर पडला आणि रवींद्र जडेजाने पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करणाऱ्या रघुवंशीला ( २४) पायचीत करून माघारी पाठवले. यंदाच्या पर्वाच चपॉकवर ही स्पिनरने मिळवलेली पहिलीच विकेट ठरली. जडेजाने त्याच षटकात नरीनची ( २७) विकेट मिळवून दिली. या विकेटसाठी महेंद्रसिंग धोनीने खास फिल्डींग लावलेली आणि लाँग ऑफवर थिक्षणाने झेल घेतला. जडेजाने त्याच्या पुढच्या षटकात वेंकटेश अय्यरला ( ३) माघारी पाठवून KKR ला चौथा धक्का दिला.