पहिला चेंडू, पहिली विकेट! मराठमोळ्या गोलंदाजाची CSK साठी कमाल, जडेजाचा भन्नाट कॅच

CSKने टॉस जिंकून जिंकून KKR ला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 07:51 PM2024-04-08T19:51:27+5:302024-04-08T19:51:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : Ravindra Jadeja completes a clean catch at point as Tushar Deshpande removes Phil Salt on the very first delivery. KKR 1/1 (1 ovs), Video  | पहिला चेंडू, पहिली विकेट! मराठमोळ्या गोलंदाजाची CSK साठी कमाल, जडेजाचा भन्नाट कॅच

पहिला चेंडू, पहिली विकेट! मराठमोळ्या गोलंदाजाची CSK साठी कमाल, जडेजाचा भन्नाट कॅच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगतोय.  CSKने टॉस जिंकून जिंकून KKR ला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. चेन्नईला घरच्या मैदानाचा फायदा उचलता येणार आहे आणि त्यांनी येथे KKRविरुद्ध १३ पैकी ९ सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये CSK ने १८, तर KKR ने १० लढती जिंकल्या आहेत व १ लढत ड्रॉ राहिली आहे. चेन्नईच्या संघात बदल पाहायला मिळत आहेत. पथिराणा आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. दीपक चहरच्या जागी शार्दूल ठाकूरचे पुनरागमन झालेय, तर मुस्ताफिजूर व समीर रिझवी हेही आज खेळणार आहेत.  


फिल सॉल्ट व सुनील नरीन या जोडीने यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारी फटकेबाजी केली आहे. पण, आज तुषार देशपांडेने पहिल्याच चेंडूवर KKR ला धक्का दिला. सॉल्टचा पॉईंटवर रवींद्र जडेजाने सुरेख झेल टिपला. मागील सामना गाजवणारा अंगकृष रघुवंशीने संयमी खेळ करताना सुनील नरीनला साथ दिली. नरीनचा उजवा खांदा दुखावला गेल्याचे दिसले, तरीही त्याने उत्तुंग फटकेबाजी केली. अंगकृषने पहिलाच सामना खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरचे चौकाराने स्वागत केले. नरीननेही सुरेख स्ट्रेट ड्राईव्हवर चौकार मिळवला. 


कोलकाता नाईट रायडर्स - फिल सॉल्ट, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, सुनील नरीन, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्थी


चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरिल मिचेल. रवींद्र जडेजा. महेंद्रसिंग धोनी, शार्दूल ठाकूर, मुस्ताफिजूर रहमान, तुषार देशपांडे, महिशा थिक्षणा  

Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : Ravindra Jadeja completes a clean catch at point as Tushar Deshpande removes Phil Salt on the very first delivery. KKR 1/1 (1 ovs), Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.