IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली

Suryakumar Yadav Injury: सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 05:51 PM2024-03-28T17:51:04+5:302024-03-28T17:52:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Big blow for Mumbai Indians know here Suryakumar Yadav's injury latest update | IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली

IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suryakumar Yadav IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव क्रिकेटपासून दूर आहे. अलीकडेच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत असलेला मुंबई इंडियन्सचा संघ संघर्ष करत आहे. (Suryakumar Yadav News) त्यांना सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. अशातच संघाबाहेर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढवल्याचे दिसते. कारण सूर्या आणखी काही सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. (Suryakumar Yadav IPL) 

सूर्या शेवटच्या वेळी डिसेंबर २०२३ मध्ये मैदानात दिसला होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेपासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दोन्हीही सामन्यांमध्ये मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करत होता. 

मुंबईची डोकेदुखी वाढली

'पीटीआय' या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार सांगितले की, सूर्यकुमार यादव लवकरच बरा होऊन मैदानात दिसेल. पण त्यासाठी त्याला आणखी काही वेळ लागेल. तो मुंबईच्या आणखी काही सामन्यांना मुकणार आहे, ज्या पद्धतीने तो पहिल्या दोन सामन्यांपासून दूर राहिला. बीसीसीआय ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्यादृष्टीने पावले टाकत आहे.

दरम्यान, बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI Match) यांच्यात सामना झाला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत विक्रमी २७७ धावसंख्या उभारली. धावांचा यशस्वीरित्या बचाव करून हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने खूप संघर्ष केला. सलामीवीर इशान किशन आणि त्यानंतर तिलक वर्मा यांनी अप्रतिम खेळी करून सामन्यात रंगत आणली. पण विशाल आव्हानापर्यंत पोहोचताना मुंबईच्या शिलेदारांना घाम फुटला. २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला घाम फुटला. मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा करू शकला आणि सामना ३१ धावांनी गमावला. 

Web Title: IPL 2024 Big blow for Mumbai Indians know here Suryakumar Yadav's injury latest update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.