IPL 2023 : Who is Suyash Sharma? इंडियन प्रीमिअर लीगने नेहमीत देशातील प्रतिभाव खेळाडूंना आपलं नशीब चमकवण्याचं व्यासपीठ दिलं आहे. काल इडन गार्डवर कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे मोठी स्टारकास्ट असलेले संघ एकमेकांना भिडले. विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, सुनील नरीन, आंद्रे रसेल.. अशी अनेक दिग्गज मंडळी काल कोलकाताच्या ऐतिहासिक स्टेडियमवर दिसली. पण, यात भाव खाऊन गेला तो युवा सुयश शर्मा ( Suyash Sharma)... १४३८ दिवसांनंतर KKRचा संघ RCB ला भिडला अन् शार्दूलने सर्वांना आश्चर्यचकीत केले. KKRच्या २०४ धावांच्या प्रत्युत्तरात RCBचा संपूर्ण संघ १२३ धावांवर गडगडला.
एका पराभवाने RCBला आपटले! नेट रनरेट + मधून मायनसमध्ये अन् तिसऱ्या क्रमांकावरून थेट...
आयपीएलमध्ये पदार्पण सामना खेळताना, १९ वर्षीय सुयशने ४ षटकांच्या स्पेलमध्ये दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा सारख्या फलंदाजांना ३० धावा देऊन बाद केले. देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव पाठिशी नसलेल्या सुयशबद्दल जाणून घेण्यासाठी सर्व 'गुगल बाबा'ची मदत घेऊ लागले, परंतु तिथेही त्यांना फार काही सापडले नाही. केकेआरचा कर्णधार नितीश राणानेही सामना संपल्यानंतर सांगितले की, तो कोण आहे हे मला देखील माहीत नाही.
सुयश दिल्लीकडून २५ वर्षांखालील क्रिकेट खेळतो आणि उजव्या हाताचा मिस्ट्री लेग-स्पिनर असण्यासोबतच त्याला जेव्हाही संधी मिळते तेव्हा तो बॅट स्विंगही करतो. IPL 2023 च्या लिलावापूर्वी सुयशला चाचण्यांसाठी बोलावण्यात आले होते. सुयशची गोलंदाजी पाहिल्यानंतर केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी लिलावादरम्यान त्याच्यासाठी मोठी रक्कम ठेवली होती. पण जेव्हा लिलावात त्याच्यावर इतर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही, तेव्हा तो केवळ २० लाखांच्या मूळ किमतीवर KKR मध्ये सामील झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"