सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादाचे खरे कारण दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग पॅनलचा सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याने स्पष्ट केले आहे. वॉटसनने कोहलीला जबाबदार धरीत नव्या वादाला तोंड फोडले. आरसीबीविरुद्ध सामना संपल्यानंतर खेळाडू आणि स्टाफ हात मिळवित होते, तेव्हा गांगुली हा विराट कोहलीकडे दुर्लक्ष करीत निघून गेला. दोन माजी कर्णधारांनी हस्तांदोलन न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या वादावर वॉटसन म्हणाला, ‘विराट रागात होता, हे खरे आहे. मैदानावर तो आक्रमकच असतो. रागाचे आणि आक्रमकतेचे कारण काहीही असू शकते.’