Join us

IPL 2023, SRH Vs MI: मुंबई वि. सनरायझर्स! विजयी लय राखणार कोण?

IPL 2023, SRH Vs MI: दोन्ही संघ सुरुवातीला दोन सामन्यांत पराभूत झाले.  त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांत दोघांनीही सरशी साधली. त्या संघांचे नाव मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद! मंगळवारी आता दोघे एकमेकांपुढे उभे ठाकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 06:05 IST

Open in App

- अयाज मेमनहैदराबाद : दोन्ही संघ सुरुवातीला दोन सामन्यांत पराभूत झाले.  त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांत दोघांनीही सरशी साधली. त्या संघांचे नाव मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद! मंगळवारी आता दोघे एकमेकांपुढे उभे ठाकतील तेव्हा सरशी कुणाची होईल, हे उद्याच समजेल. एक खरे की जो संघ बाजी मारेल, तो विजयी हॅट्ट्रिक साधणार आहे.

स्थळ: हैदराबाद, वेळ : सायंकाळी ७:३० पासून

मुंबई इंडियन्स रोहितच्या नेतृत्वात सूर्यकुमार, ईशान किशन, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड हे उपयुक्त योगदानास सज्ज. अनुभवी पीयूष चावला, ऋतिक शौकीन यांचा फिरकी मारा प्रभावी पण जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत रिले मेरेडिथचा वेगवान मारा निष्प्रभ. अर्जुन तेंडुलकर, डुआन यान्सेन यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता.

सनरायझर्स हैदराबाद एडेन मार्करामच्या नेतृत्वात हॅरी ब्रुक, राहुल त्रिपाठी या नायकांचा शोध लागला. या तिघांचे धावा काढण्यात उपयुक्त योगदान. फिरकीपटू मयंक मार्कंडे, वेगवान उमरान मलिक, मार्को यान्सेन आणि भुवनेश्वर कुमार यांचाही मारा दमदार ठरला आहे. या सामन्यात जुळे भाऊ मार्को आणि डुआन आमने - सामने असल्याने कामगिरीसाठी स्पर्धा अनुभवायला मिळेल.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादरोहित शर्मा
Open in App