Join us

IPL 2023, SRH vs MI Live : रोहित शर्मा थोडक्यात वाचला; इशानच्या 'त्या' कृतीनंतर हिटमॅन मैदानावर नाही टिकू शकला

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) ६००० धावांचा टप्पा ओलांडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 20:09 IST

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) ६००० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये सहा हजार + धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात रोहित चांगल्या टचमध्ये दिसत होता. त्याने काही अप्रतिम फटकेही मारले, परंतु इशान किशनच्या एका फटक्यावर तो थोडक्यात बचावला. त्यानंतर तो फारकाळ खेळपट्टीवर टिकू नाही शकला. 

भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात चेंडू चांगला वळवला, परंतु रोहितने अखेरच्या चेंडूवर पदलालित्य दाखवताना कव्हरच्या वरून चौकार खेचला. रोहितने सलग तीन चौकार खेचून वॉशिंग्टन सुंदरचं स्वागत केले आणि त्याने १४ धावा करून आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा त्याने ओलांडला. रोहितने ४६१६ चेंडूंत ६००० धावा पूर्ण केल्या आणि सर्वात कमी चेंडूंत हा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांत तो तिसऱ्या स्थानावर आला. वॉर्रने ४२८५ चेंडू, कोहलीने ४५९५ चेंडू आणि धवनने ४७३८ चेंडूंचा सामना केला. रोहित आज चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि त्याने टी नटराजनलाही चांगले फटके मारले. SRHच्या गोलंदाजांनी त्वरीत त्याच्या चेंडूत बदल केला अन् रोहित फसला. १८ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर रोहित बाद झाला.  

यापूर्वी इशान किशनने मारलेल्या एका सरळ फटक्यावर रोहित थोडक्यात वाचला. इशानने मारलेला चेंडू वेगाने नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या रोहितच्या दिशेने गेला. रोहित त्याला चकवणार तोच चेंडू त्याच्या पॅडच्या वरच्या बाजूला लागला. त्यानंतर रोहित क्रिजवर पडला. इशान व रोहित दोघंही त्यानंतर हसू लागले. हा फटका थोडा इतके तिकडे लागला असता तर रोहितला गंभीर दुखापत झाली असती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्माइशान किशनमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App