IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : रोहित शर्माने छोटी खेळी करून मोठा विक्रम करून माघारी परतल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगला मारा केला. इशान किशन, कॅमेरून ग्रीन यांना मोठे फटके मारण्याची संधी त्यांनी दिली नाही. पण, मुंबई इंडियन्सकडून खेळणारा, परंतु हैदराबादचा लोकल बॉय तिलक वर्मा ( Tilak Verma) ने कॅमेरून ग्रीनसह मुंबईच्या धावांचा वेग वाढवला. ग्रीनने अर्धशतक झळकावताना मुंबईला मोठी धावसंख्या उभारून दिली. '
उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video
रोहित आज चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि त्याने टी नटराजनलाही चांगले फटके मारले. SRHच्या गोलंदाजांनी त्वरीत त्याच्या चेंडूत बदल केला अन् रोहित फसला. १८ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर रोहित बाद झाला. रोहितच्या विकेटनंतर मुंबईची धावगती मंदावली. कॅमेरून ग्रीन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु SRHच्या फिरकी गोलंदाजांनी त्याला जखडून ठेवले. १८ चेंडूंनंतर मुंबईला चेंडू सीमापार पाठवण्यात यश आले. ग्रीनच्या षटकारानंतर इशाननेही आक्रमक पवित्रा पुन्हा घेतला. त्याने आयपीएलमध्ये ४०००+धावांचा टप्पा ओलांडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"