Join us

IPL 2023, SRH vs LSG Live : कृणाल पांड्याचे सलग २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video

हैदराबादच्या मैदानावर SRHसमोर आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे आणि त्यांनी ११ सामन्यांत ११ गुण ( एक सामना पावसामुळे रद्द) कमवत प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 16:48 IST

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : १० सामन्यांत ८ गुणांमुळे प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला हैदराबाद संघ कोणाचे गणित बिघडवते याची उत्सुकता आहे. हैदराबादच्या मैदानावर SRHसमोर आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे आणि त्यांनी ११ सामन्यांत ११ गुण ( एक सामना पावसामुळे रद्द) कमवत प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. हैदराबादने आज नाणेफेक जिंकून LSG विरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अनमोलप्रीत सिंग आणि अभिषेक शर्मा ( ७) या युवा फलंदाजांनी SRHला आश्वासक सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिसऱ्या षटकात युधवीर सिंगने LSGला पहिले यश मिळवून दिले.  राहुल त्रिपाठीने सलग दुसऱ्या सामन्यात खेळातील सातत्य कायम राखताना काही सुरेख फटकेबाजी केली. पण, यश ठाकूरच्या चेंडूवर यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने अफलातून झेल घेत त्रिपाठीला ( २०) माघारी पाठवले. 

अनमोलप्रीत एका बाजूने चांगला खेळ करताना दिसला अन् कर्णधार एडन मार्करामच्या संयमी खेळाची त्याला साथ मिळाली. अनमोलप्रीतने ९व्या षटकात अमित मिश्राला खणखणीत फटका खेचला. पण, मिश्राने अनुभव कामी आणला अन् पुढच्या चेंडूवर पुढे आलेल्या अनमोलप्रीतला कॉट अँड बोल्ड करून माघारी पाठवले. अनमोलप्रीतने २७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. ३ विकेट गमावूनही SRH ने १० षटकांत ९५ धावा फलकावर चढवल्या. १३व्या षटकात कृणाल पांड्याने टाकलेला चेंडू कसला वळला, जो मार्करामलाही नाही कळला... डी कॉकने तितक्याच चपळाईने स्टम्पिंग केले मार्करामन २८ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर कृणालने अप्रतिम चेंडू टाकून ग्लेन फिलिप्सचा दांडा उडवला. 

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या 

राजस्थान रॉयल्सचे फटके, मुंबई इंडियन्सला 'चटके'! Play Off च्या शर्यतीतून KKR ९५% OUT!

यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग भारताच्या वन डे संघात; रोहित, विराट यांना दिली जाणार विश्रांती

 

टॅग्स :आयपीएल २०२३क्रुणाल पांड्यालखनौ सुपर जायंट्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App