Join us

IPL 2023: संजू सॅमसनचा एका चुकीचा निर्णय आणि राजस्थान रॉयल्सचा निसटता पराभव, नेमकं काय घडलं 

IPL 2023, PBKS Vs RR: पंजाबने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा राजस्थानने जोरदार पाठलाग केला होता. मात्र राजस्थान रॉयल्सला अखेरीस निसटता पराभव पत्करावा लागला. आता या पराभवासाठी कर्णधार संजू सॅमसनने घेतलेला एक चुकीचा निर्णय कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 21:48 IST

Open in App

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सलापंजाब किंग्सकडून ५ धावांनी पराभूत व्हावे लागले. पंजाबने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा राजस्थानने जोरदार पाठलाग केला होता. मात्र राजस्थान रॉयल्सला अखेरीस निसटता पराभव पत्करावा लागला. आता या पराभवासाठी कर्णधार संजू सॅमसनने घेतलेला एक चुकीचा निर्णय कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

पंजाब किंग्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने रविचंद्र अश्विनला सलामीसाठी पाठवले. अश्विन सलामीवीर म्हणून चमक दाखवू शकला नाही, हीच बाब अखेरीस राजस्थानच्या पराभवाचे कारण ठरल्याचे सांगितले जात आहे. कर्णधार शिखर धवन ( ८६ धाव), प्रभसिमरन सिंग (५६धावा) यांनी दिलेल्या तुफानी सुरुवातीच्या जोरावर पंजाबने २० षटकांमध्ये १९७ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर नाथन एलिसच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव अडखळला होता. अखेरीस त्यांना पराभूत व्हावे लागले. 

राजस्थानच्या डावाच्या सुरुवातीला नियमित सलामीवीर जोस बटलर फलंदाजी करण्यास अनुपलब्ध असल्याने देवदत्त पडिक्कलचा पर्याय उपलब्ध असतानाही रविचंद्रन अश्विनला सलामीला पाठवण्यात आले. अश्विनला सलामीला पाठवण्याच्या निर्णयाबाबत सामन्यानंतर संजू सॅमसनने सांगितले की, जोस बटलर फिट नव्हता. झेल पकडल्यानंतर त्याच्या बोटाला टाके पडले होते. पडिक्कलला सलामीला न पाठवण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे दोन फिरकी गोलंदाज आहेत. त्यामधील एक हा डावखुरा आणि एक लेग स्पिनर आहे. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये आम्हाला हा फलंदाज हवा होता.

यावेळी अखेरपर्यंत झुंज देणाऱ्या जुरोलचं संजू सॅमसनने कौतुक केलं. तो म्हणाला की, गेल्या दोन हंगामांपासून तो आमच्यासोबत आहे. आम्ही वास्तवात आनंदी आहोत. जेव्हा तुम्ही आयपीएलमध्ये खेळता तेव्हा आयपीएल सुरू होण्याआधी एक आठवड्याचं शिबीर आयोजित केलं जातं. मात्र  आमच्या अकादमीने हजारो चेंडूंचा सामना करताना पाच आठवडे काम केलं. आमच्या संघात असा फलंदाज आहे, याचा आम्हाला आनंद आहे.  

टॅग्स :संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सपंजाब किंग्सआयपीएल २०२३
Open in App