IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी स्वतःहून विकेट फेकल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले नाही. यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर हे चुकीचे फटके मारून बाद झाले. इम्पॅक्ट प्लेअर देवदत्त पडिक्कलच्या विकेटने मात्र वाद निर्माण झालाय. जो रूटला बाद करून वेन पार्नेलने आजच्या सामन्यातील तिसरी विकेट घेतली आणि RR ची अवस्था ५ बाद २८ अशी केली.
फॅफ ड्यू प्लेसिस ( ५५) आणि ग्लेन मॅक्सवेल ( ५४) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर RCB ने ५ बाद १७१ धावा केल्या. विराट कोहलीसह ( १८) केएम आसीफने RCBच्या दोन्ही सलामीवीरांची विकेट घेतली. अॅडम झम्पाने एकाच षटकात महिपाल लोम्रोर ( १) व दिनेश कार्तिक ( ०) यांची विकेट घेतली. संदीप शर्माने RRसाठी महत्त्वाची मॅक्सवेलची विकेट घेतली. फॅफ व विराट यांनी ५०, तर फॅफ व मॅक्सवेल यांनी ६९ धावांची भागीदारी केली. अनुज रावतने २०व्या षटकात दोन षटकार व १ चौकार खेचून RCBला ५ बाद १७१ धावांपर्यंत पोहोचवले.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'
चेन्नई सुपर किंग्स आज हरल्यास, काय होईल? KKR जिंकूनही CSK ठरणार 'बाजीगर'!
नवख्या गोलंदाजाने विराटला गंडवलं, कोहली आकाशाकडे पाहत राहिला अन्...
पाचव्या षटकात मिचेल ब्रेसवेलला गोलंदाजीला आणले गेले अन् इम्पॅक्ट प्लेअर देवदत्त पडिक्कलने ( ४) सिराजच्या हातात झेल दिला, परंतु त्याच्या हातात विसावल्यानंतर चेंडू जमिनिवर टप्पा पडलेला दिसला. पण, सिराजची बोटं चेंडू खाली असल्याने तिसऱ्या अम्पायरनेही पडिक्कलला बाद दिले. RRचे ४ फलंदाज २० धावांवर माघारी परतले. वेन पार्नेलने पुढच्याच षटकात जो रूटला ( १०) पायचीत करून RRची अवस्था ५ बाद २८ अशी केली. ध्रुव जुरेलही १ धावेवर माघारी परतला. ब्रेसवेलने ही विकेट घेतली.