Join us

IPL 2023, RR vs RCB Live : नवख्या गोलंदाजाने विराटला गंडवलं, कोहली आकाशाकडे पाहत राहिला अन्...

IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 16:16 IST

Open in App

IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला सावध पण चांगली सुरुवात करून दिली. RRच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये चांगला मारा करताना RCBच्या स्फोटक फलंदाजांना दडपणात ठेवले. त्याचाच फायदा केएम आसीफने उचलला अन् सातव्या षटकात विराटला गंडवलं... 

RCB ला मागील दोन सामन्यांत हार पत्करावी लागल्याने प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांच्यासमोर विजय हा एकमेव पर्याय उरला आहे. RR ने तीन सामन्यांची पराभवाची मालिका मागील सामन्यात खंडित केली आणि आज ते जिंकल्यास ते टॉप ४ मध्ये धडक देऊ शकतील. RCBच्या हातात एक अतिरिक्त सामना आहे, तर RRच्या दोनच लढती शिल्लक आहेत. त्यामुळे आजचा निकाल हा त्यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. RR ने आज ट्रेंट बोल्टला बसवून अॅडम झम्पाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले आहे, तर RCB ने जोश हेझलवूड व वनिंदू हसरंगा यांच्याजागी वेन पार्नेल व मिचेल ब्रेसवेल यांना संधी दिलीय. 

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या 

१० मधून २ गेले, ८ राहीले! प्ले ऑफच्या शर्यतीचे गणित अधिक चुरशीचे झाले

BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'

चेन्नई सुपर किंग्स आज हरल्यास, काय होईल? KKR जिंकूनही CSK ठरणार 'बाजीगर'!

विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सावध खेळ करण्यावरच भर दिला, परंतु जरा हलका चेंडू मिळाल्यास त्यांनी फटके मारण्याची संधी गमावली नाही. झम्पाने टाकलेल्या चौथ्या षटकात १२ धावा आल्या. संजू सॅमसनने पॉवर प्लेमध्ये तीन फिरकीपटूंना आणले आणि त्यामुळेच RCBला ४२ धावाच करता आल्या. सातव्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला रन आऊट करण्याची संधी यशस्वी जैस्वालने गमावली. डायरेक्ट हिट RCBला धक्का देणारा ठरला असता. पण, पुढच्या चेंडूवर केएम आसीफने गतीमध्ये मिश्रण करताना विराटला चकवले अन् चेंडू खूप उंच उडाला व यशस्वीने झेल टिपला. विराट १८वर बाद झाल्याने RCBला ५० धावांवर पहिला धक्का बसला. 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App