IPL 2023, RR vs RCB Live : फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांचे अर्धशतक, अनुज रावतच्या ६,६,४ ठरणार निर्णायक
IPL 2023, RR vs RCB Live : फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांचे अर्धशतक, अनुज रावतच्या ६,६,४ ठरणार निर्णायक
IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या पुण्याईच्या जोरावरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
IPL 2023, RR vs RCB Live : फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांचे अर्धशतक, अनुज रावतच्या ६,६,४ ठरणार निर्णायक
IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : फॅफ ड्यू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या पुण्याईच्या जोरावरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासून सामन्यावर पकड घेतली होती आणि जेव्हा जेव्हा ती सैल करण्याचा RCB ने प्रयत्न केला, तेव्हा विकेट पडली. विराट कोहली आज पुन्हा अपयशी ठरला, परंतु त्याने फॅफसह पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या होत्या. केएम आसीफने RCBच्या दोन्ही महत्त्वाच्या सलामीवीरांना माघारी पाठवले, त्यात अॅडम झम्पाने एकाच षटकात दोन धक्के दिले.
RCBने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सावध खेळ करण्यावरच भर दिला, परंतु जरा हलका चेंडू मिळाल्यास त्यांनी फटके मारण्याची संधी गमावली नाही. पॉवर प्लेमध्ये तीन फिरकीपटूंचा सामना करावा लागल्याने त्यांना ४२ धावाच करता आल्या. सातव्या षटकात केएम आसीफने संथ चेंडू टाकून विराटला ( १८) चकवले अन् यशस्वीने झेल टिपला. RCBला ५० धावांवर पहिला धक्का बसला. ग्लेन मॅक्सवेल व फॅफ यांनी त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मॅक्सवेलने काही उत्तुंग फटके मारलेही, परंतु RRच्या गोलंदाजांचा मारा अचूक राहिला. RCBच्या फलंदाजांना एक-दोन धावेवर समाधान मानावे लागत होते आणि त्यामुळे १० षटकांत १ बाद ७८ धावा फलकावर चढल्या होत्या.
फॅफ व मॅक्सवेल यांनी ४२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना संघाची धावसंख्या तिहेरी आकड्यात नेली. आता शेवटच्या ६ षटकांत मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान या सेट फलंदाजांवर होते. फॅफने हात मोकळे करण्यास सुरूवात करताना षटकार खेचून यंदाच्या पर्वातील सातवे अर्धशतक पूर्ण केले. आसीफनेच ही दुसरी विकेट मिळवून दिली आणि कॅच यशस्वीनेच पकडली. फॅफ ४४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला आणि मॅक्सवेलसह त्याची ६९ धावींची भागीदारी संपुष्टात आली. महिपाल लोम्रोर ( १) पुढच्याच षटकात झम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पाठोपाठ दिनेश कार्तिक भोपळ्यावर पायचीत झाला.