Join us

IPL 2023, RCB vs PBKS Live : मारला पॅडल स्वीप, झाला झेलबाद! जितेशने घेतलेल्या अफलातून कॅचवर विराटला बसेना विश्वास, Video  

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : मोहालीत आज फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांचे वादळ घोंगावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 17:33 IST

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : मोहालीत आज फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांचे वादळ घोंगावले. पहिल्या १० षटकांत या दोघांनी ९१ धावा चोपलेल्या, परंतु पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगले पुनरागमन केले. या दोघांनी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली आणि मोहालीवरील RCBकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पण, विराटचे वादळ 'विचित्र' पद्धतीने रोखण्यात पंजाबला यश आले. फिरकीपटू हरप्रीत ब्रारने ( Harpreet Brar) ही विकेट घेतली आणि यष्टिरक्षक जितेश शर्माने अफलातून झेल टिपला. 

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन

विराटच्या नेतृत्वाखाली आज RCB मैदानावर उतरला अन् PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फॅफ व विराटने सुरुवात चांगल्या फटक्यांनी केली. या जोडीने १० षटकांत ९१ धावा जोडल्या, परंतु त्यानंतर PBKS च्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. हरप्रीत ब्रारने टाकलेला चेंडू पॅडल स्वीप मारण्याचा विराटकडून प्रयत्न झाला अन् यष्टिरक्षक जितेश शर्माने चतुराई दाखवताना झेल घेतला. विराट ४७ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल ( गोल्डन डक) बाद झाला. हरप्रीतची हॅटट्रिक काही पूर्ण होऊ शकली नाही. 

फॅफ  ५६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ८४ धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिक ( ७) आजही फेल गेला. RCBचे मोठी धावसंख्या गाठण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आणि त्यांना ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्स
Open in App