IPL 2023, RCB vs PBKS Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करताना आज दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 04:49 PM2023-04-20T16:49:05+5:302023-04-20T16:49:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli becomes the first captain to reach 6500 runs in T20s, Break MS Dhoni Record, Virat caught behind for 59 (47) attempting  | IPL 2023, RCB vs PBKS Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन

IPL 2023, RCB vs PBKS Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करताना आज दिसला. पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत RCBने नियमित कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले, परंतु नेतृत्व विराट करतोय. शिखर धवन आजही खेळत नसल्याने सॅम कुरन PBKSचे नेतृत्व करतोय आणि त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. विराटने ११ ऑक्टोबर २०२१ मध्ये RCBचे शेवटचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर  ५५६ दिवसांनी तो पुन्हा कॅप्टन म्हणून दिसल्याने चाहते खूश झाले. 

बनवाबनवी! फॅफ ड्यू प्लेसिस Playing XI मध्ये, तरीही विराट कोहली कॅप्टन; जाणून घ्या झोल

ड्यू प्लेसिस व विराट यांनी RCBला अपेक्षित चांगली सुरूवात करून दिली आणि या दोघांनी ६ षटकांत १०च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. फॅफने वादळी फटकेबाजी करताना यंदाच्या आयपीएलमध्ये ३०० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. फॅफने ३२ चेंडूंत IPL 2023 मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले आणि RCBला १० षटकांत बिनबाद ९१ धावांपर्यंत मजल मारून दिलीय. या दोघांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली. RCBच्या संघात ४३ वेळा शतकी भागीदारी झाली आहे आणि आयपीएलमध्ये एका संघाकडून झालेली ही सर्वोत्तम आकडेवारी ठरली. विराटनेही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफ व विराट मैदानावर असूनही अपेक्षित रन रेट दिसत नव्हता, पंजाबच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगला मारा केला. 


ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६५०० + धावा करणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरला.  त्याने महेंद्रसिंग धोनीचा ( ६१७६) विक्रम मोडला. विराटने १८६ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला, धोनीनं २७३ इनिंग्जमध्ये ६१७६ धावा केल्या. त्यानंतर रोहित शर्मा ५४८९ ( २०२ इनिंग्ज), आरोन फिंच ५१७४ ( १६८ इनिंग्ज), गौमत गंभीर ४२४२ ( १६६ इनिंग्ज) असा क्रमांक येतो. ट्वेंटी-२०त ५०+ धावा ५४ वेळा करणारा विराट पहिला कर्णधार आहे. विराटच्या नावावर ट्वेंटी-२०त ४९ अर्धशतकं व ५ शतकं आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli becomes the first captain to reach 6500 runs in T20s, Break MS Dhoni Record, Virat caught behind for 59 (47) attempting 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.