Join us

IPL 2023, RCB vs MI: 'वडापाव..वडापाव...'; Live सामन्यात RCBच्या चाहत्यांनी रोहित शर्माला डिवचले, पाहा Video

IPL 2023, RCB vs MI: चेन्नई सुपर किंग्ससह आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 13:20 IST

Open in App

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने घरच्या मैदानावर खेळताना बलाढ्य मुंबई इंडियन्सचा ८ विकेट्स राखत पराभव करत यंदाच्या आयपीएलमध्ये दणदणीत विजयी सलामी दिली. जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आरसीबीने कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बाजी मारली. 

मुंबईची आयपीएलमध्ये सलग अकराव्यांदा पराभवाने सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्ससह आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. या संघाची मॅच कोणत्याही मैदानात असो, तेथे चाहते सामना पाहण्यासाठी उपस्थित राहतात. आरसीबी आणि मुंबईचा सामना बंगळुरुत म्हणजेच आरसीबीच्या घरील मैदानात पार पडला.

तिलक वर्माची आक्रमक फलंदाजी पाहून आई-वडिल भावूक; उभे राहून वाजवल्या टाळ्या, Video

यावेळी हा सामना पाहण्यासाठी दोन्ही संघाचा प्रेक्षकवर्ग उपस्थित होता. याचदरम्यान आरसीबीच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला डिवचल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा..वडापाव....रोहित शर्मा....वडा पाव, अशा घोषणा आरसीबीच्या चाहत्यांनी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. 

विराटच्या मॅचविनिंग खेळीवर धोनीची छोटी इनिंग पडली भारी; चाहत्यांनी आकड्यातून दिला कौल

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केलेल्या आरसीबीने मुंबईला २० घटकांत ७ बाद १७१ धावांवर रोखले. हे आव्हान आरसीबीने १६.२ षटकांतच पार करताना २ बाद १७२ धावा केल्या. डुप्लेसिसने ४३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ७३ धावा केल्या. कोहलीने ४९ चेंडूंत नाबाद ८२ धावा फटकावताना ६ चौकार व ४ षटकार मारले. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात पहिल्याच चेंडूवर कोहलीचा झेल सोडला. डुप्लेसिस- कोहली यांनी ८९ चेंडूत १४३ धावांची जबरदस्त सलामी देत निकाल स्पष्ट केला. या सामन्याचा डुप्लेसिस सामनावीर ठरला. 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीसोशल व्हायरल
Open in App