Join us

DC vs RCB मॅच संपल्यानंतर सौरव गांगुली अन् विराट कोहली आले समोरासमोर अन्... 

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सचा आज दिल्लीच्या मैदानावर डंका राहिला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 23:29 IST

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सचा आज दिल्लीच्या मैदानावर डंका राहिला.. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूने ठेवलेले १८२ धावांचे लक्ष्य DC ने १६.४ षटकांत ७ विकेट्स राखून सहज पार केले. ८७ धावांची खेळी करणारा फिल सॉल्ट ( Phil Salt) आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सामना सुरू असताना मोहम्मद सिराजसोबत त्याचे खटके उडाले, परंतु निकालानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली पाहायला मिळाली. पण, सौरव गांगुली आणि विराट कोहली जेव्हा समोरासमोर आले, तेव्हा स्टेडियम दणाणून सुटले अन् पुढे जे घडले... 

तू गप्प बस, तू नको सांगू! मोहम्मद सिराज DCच्या फिल सॉल्टवर भडकला, वॉर्नर मध्ये पडला

 फॅफ ड्यू प्लेसिस ( ४५) व विराट कोहली ( ५५) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने फॅफ आणि ग्लेन मॅक्सवल ( ०) यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवले. विराट व महिपाल लोम्रोर यांनी ३२ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी केली. कार्तिक ११ धावांवर वॉर्नरच्या हाती झेलबाद झाला. महिपाल २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. RCB ने ४ बाद १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर ( २२) व सॉल्ट यांनी ६० धावांची सलामी दिली. मिचेल मार्श ( २६) व रिली रूसोवू ( ३५*) यांनी चांगली फटकेबाजी केली. सॉल्टने ४५ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ८७ धावा कुटल्या. दिल्लीने १६.४ षटकांत ३ बाद १८७ धावा करून सामना जिंकला.

दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या लढतीत RCBचा विराट कोहली व DC चा मेंटॉर सौरव गांगुली यांच्यात तणावाचे चित्र पाहायला मिळाले होते. विराटने 'दादा'ला खून्नस दिली होती, तर दादानेही त्याच्याकडे दुर्लक्ष करताना हात मिळवणे टाळले होते. पण, आज पुन्हा हे दोंघ समोरासमोर आले, तेव्हा एकमेकांना हातही मिळवला अन् मिठीही मारली... 

 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीसौरभ गांगुलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App