IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : आतापर्यंत तगड्या फलंदाजांच्या फौजेच्या जोरावर गुजरात टायटन्सने कितीही मोठ्या धावा असल्या तरी त्यांचा यशस्वी पाठलाग केला. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेल्या १७३ धावा या त्यांच्यासाठी काहीच नव्हत्या. पण, महेंद्रसिंग धोनीने CSK गोलंदाजांचा सुरेख वापर केला अन् GT ला बॅकफूटवर फेकले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानेही धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक करताना हीच गोष्ट बोलून दाखवली. पण, खरी मॅच ही ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) फिरवली. 
तत्पूर्वी, 
ऋतुराज गायकवाड ( ६०) आणि डेव्हॉन कॉनवे ( ४०) यांनी ८७ धावांची भागीदारी करून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. अजिंक्य रहाणे ( १७), अंबाती रायुडू ( १७) व रवींद्र जडेजा ( २२) यांनी शेवटच्या षटकात सुरेख फटके मारताना ७ बाद १७२ धावांपर्यंत संघाला पोहोचवले. प्रत्युत्तरात गुजरातकडून शुबमन गिल ( ४२) आणि राशीद खान ( ३०) हे दोघं वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. चेन्नईच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली अन् धोनीच्या क्षेत्ररक्षणाच्या सेटींगने त्यांना मदत मिळाली. दीपक चहर ( २-२९), महीष तीक्षणा ( २-२८), रवींद्र जडेजा ( २-१८) व मथिशा पथिराणा ( २-३७) यांनी उत्तम मारा केला. ( 
CSK vs GT Live Scoreboard मराठीत)  
शुबमन गिल आजही चमकला, विराटनंतर त्याने मोठा पराक्रम केला
रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरीसह गुजरातची 'झोप' उडवली, ५ फलंदाज परतले माघारी
 
मथिशा पथिराणाने १८व्या षटकात मोठी विकेट मिळवून दिली. विजय शंकरचा ( १४) अविश्वसनीय झेल ऋतुराजने घेतला अन् सामना फिरला. पुढच्याच चेंडूवर दर्शन नळकांडे रनआऊट झाला. १२ चेंडूत ३५ धावा हव्या असताना राशीद वर सर्व भिस्त होती. पण, तुषारने १९व्या षटकात राशीदला ३० धावा ( १६ चेंडू) झेलबाद केले. गुजरातचा संपूर्ण संघ १५७ धावांत तंबूत परतला. चेन्नईने सर्वाधिक १० वेळा आयपीएल फायनल गाठली अन् गुजरातला ऑल आऊट करणारा तो पहिला संघ ठरला. हा त्यांच्या गुजरातविरुद्धचा पहिलाच विजय ठरला.