IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्ससाठी पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने चांगली खेळी केली. ऋतुराजच्या वेगाला आज कॉनवे मॅच करू शकला नाही. ऋतुराजची विकेट पडल्यानंतर गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड घेतली. त्यामुळे CSK बॅकफूटवर गेले होते आणि पाच षटकं त्यांना चौकारही मारता आला नव्हता. अंबाती रायुडूने धावा वाढवण्याचा केलेला प्रयत्नही यशस्वी नाही झाला. MS Dhoni शेवटची दोन षटकं असताना मैदानावर आला अन् चेपॉक दणाणून निघाले.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज आणि कॉनवे या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा चांगली सुरूवात करून दिली. ऋतुराजची दुसऱ्या षटकात विकेट पडली होती, परंतु No Ball असल्याने गुजरात टायटन्सला विकेट मिळाली नाही. ऋतुराज व कॉनवे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. ऋतुराजने ३६ चेंडूंत यंदाच्या पर्वातील सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. कॉनवे सावध खेळ करत होता, तर ऋतुराज बहरदार फटकेबाजी करताना दिसला. ११व्या षटकात ८७ धावांवर CSKला धक्का बसला. ऋतुराजचा फटका चुकल्याने चेंडू हवेत उडाला अन् डेव्हिड मिरलने सोपा झेल घेतला. ऋतुराज ४४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ६० धावांवर माघारी परतला.
ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला
धावा करायच्या की पर्यावरणासाठी 'डॉट' बॉल खेळायचा? TATA, BCCIचा भन्नाट उपक्रम