IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला 

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 07:49 PM2023-05-23T19:49:25+5:302023-05-23T19:49:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Darshan Nalkande dismissed Ruturaj Gaikwad, but it's a No Ball. | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला 

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यंदाच्या पर्वात घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळतोय आणि त्यामुळे चेन्नईचं चेपॉक स्टेडियम पुन्हा एकदा धोनीमय दिसतंय. प्रथम फलंदाजीला आलेल्या CSKला दुसऱ्याच षटकात धक्का बसला होता, परंतु दर्शन नळकांडेच्या चुकीने GTला विकेट मिळाली नाही. 


गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने यश दयालच्या जागी दर्शन नळकांडेची निवड केली. CSKलाही प्रथम गोलंदाजी करायची होती, असे धोनीने सांगितले. चेन्नईने सलग १० सामन्यांत त्याच प्लेइंग इलेव्हनसह उतरण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीने पहिल्या षटकात टिच्चून मारा केला, तर त्यात दर्शनने त्याच्या पहिल्या षटकात CSKला मोठा धक्का दिला होता. तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल शुबमन गिलने टिपला गेला. ऋतुराज पेव्हेलियनच्या दिशेने जातच होता, पण तितक्यात अम्पायरने त्याला रोखले अन् एकच जल्लोष सुरू झाला. कारण, दर्शनचा तो चेंडू No Ball ठरला अन् फ्री हिटवर ऋतुराजने षटकार खेचला. ( CSK vs GT Live Scoreboard

 

Web Title: IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Darshan Nalkande dismissed Ruturaj Gaikwad, but it's a No Ball.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.