Join us

IPL 2023 Points Table: राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table

IPL 2023 Points Table: राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:07 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवताना तुफान फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला ३२ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ बाद २०२ धावा केल्यानंतर चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७० धावांवर रोखले. यासह राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात दुसऱ्या स्थानावर तर लखनौ चौथ्या स्थानावर आहे. बंगळुरु पाचव्या स्थानावर असून पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर असून मुंबई आठव्या स्थानावर आहे. हैदराबाद ४ गुणांसह नवव्या स्थानावर असून दिल्ली ४ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे. 

आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या  सामन्यावर असतील, ज्यामध्ये पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मोहाली येथे खेळला जाणार असून यामधील विजयी संघ १० गुणांसह गटात प्रवेश करू शकेल. लखनौ जिंकल्यास ते चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकते. जर त्याने मोठा विजय मिळवला तर त्याला पहिले स्थानही मिळू शकते. त्याचबरोबर पंजाब सध्या सहाव्या स्थानावर असून येथे विजय मिळवल्यानंतर किमान चौथ्या स्थानावर पोहोचू शकतो.

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App