Join us

IPL 2023 Points Table : मुंबई इंडियन्ससह ३ संघांची 'पाटी' राहिलीय कोरी! चेन्नई सुपर किंग्सने घेतली उत्तुंग भरारी 

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 08:05 IST

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. अजिंक्य रहाणे  ( Ajinkya Rahane), रवींद्र जडेजा हे या विजयाचा हिरो ठरले. मिचेल सँटनर, शिवम दुबे व तुषार देशपांडे यांनीही CSKच्या विजयात हातभार लावला. MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. आयपीएल २०२३ मध्ये मुंबईला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि तालिकेत त्यांची पाटी कोरीच राहिली आहे.   

सीनियर्सनी आता पुढाकार घेऊन, संघासाठी खेळायला हवं; पराभवानंतर रोहित शर्माचं स्पष्ट मत

CSK ने मुंबई इंडियन्सचे १५८ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत पार केले. रवींद्र जडेजा ( ३-२०), मिचेल सँटनर ( २-२८) आणि तुषार देशपांडे ( २-३१) यांनी चांगली गोलंदाजी केली.अजिंक्य रहाणेने  ७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. शिवम दुबेने ( २८) ने ऋतुराजसह ४३ धावांची भागीदारी केली. अंबाती रायुडू ( २०*) व ऋतुराजने ( ४०*) चेन्नईला ७ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली. आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत तीन संघांना आतापर्यंत गुणांचा भोपळा फोडता आलेला नाही आणि त्यापैकी एक मुंबईचा संघ ठरला आहे.

मुंबईला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या घरच्या मैदानावर बेक्कार हरवले होते अन् आज स्वतःच्या घरी ते CSKकडून हरले. २ सामन्यांत एकही विजय न मिळवल्याने मुंबई -१.३९ नेट रन रेटसह आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आजच्या विजयानंतर सहाव्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App