IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दोन दमदार सामने झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 11:50 PM2023-04-16T23:50:00+5:302023-04-16T23:50:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : Venkatesh Iyer's century changes a lot in Orange cap table, race between 3 for the Purple Cap; Rajasthrn Royals tops the Point Table | IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दोन दमदार सामने झाले. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला दुपारचा सामना एकतर्फी झाला, परंतु वेंकटेश अय्यरच्या ( Venkatesh Iyer) शतकाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ब्रेंडन मॅक्युलमनंतर १५ वर्षांनी KKRच्या फलंदाजाने आयपीएलमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीने मात्र हे शतक व्यर्थ ठरले. दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन व शिमरोन हेटमायर यांच्या फटकेबाजीने वाहवाह मिळवली. राजस्थान रॉयल्सने प्रथमच गुजरात टायटन्सवर विजयाची नोंद केली.

संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर यांचे वादळ; हार्दिक पांड्याचे घरच्या मैदानावर गर्वहरण


KKR च्या वेंकटेश अय्यरने ५१ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांसह १०४ धावांची दमदार खेळी केली. आंद्रे रसेलने ११ चेंडूंत नाबाद २१ धावा करून कोलकाताला ६ बाद १८५ धावा करून दिल्या. प्रत्युत्तरात इशान किशान ( ५८), कर्णधार सूर्यकुमार यादव ( ४३)  व तिलक वर्मा ( ३०)  यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. १७.४ षटकांत मुंबईने ५ बाद १८६ धावा केल्या. टीम डेव्हिड १३ चेंडूंत २४ धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या सामन्यात गुजरातचे ७ बाद १७७ धावांचे टार्गेट राजस्थानने ३ विकेट्स राखून पार केले. देवदत्त पडिक्कल ( २६) व संजू सॅमसन यांनी ४३ धावांची भागीदारी केली.

 
संजूने ३२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ६० धावा कुटल्या. त्याने हेटमायरसह २७ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली.  हेटमायरने २६ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५६ धावा करून RRला विजय मिळवून दिला. RR ने ७ बाद १७९ धावा केल्या. आर अश्विनच्या ३ चेंडूंत १० धावा महत्त्वाच्या ठरल्या. या विजयाने राजस्थानने ८ गुणांसह तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

वेंकटेशने शतकासह २३४ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आला आहे. शिखर धवन ( २३३) एक धावेच्या फरकेने दुसऱ्या, शुबमन गिल ( २२८) सहा धावांच्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचायुजवेंद्र चहल, लखनौ सुपर जायंट्सचा मार्क वूड व गुजरात टायटन्सचा राशीद खान हे प्रत्येकी ११ विकेट्ससह एकमेकांना कडवी टक्कर देत आहेत. 

Web Title: IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : Venkatesh Iyer's century changes a lot in Orange cap table, race between 3 for the Purple Cap; Rajasthrn Royals tops the Point Table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.