IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने पियूष चावलाच्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले. PBKS च्या जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी MIच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. अमरावतीचा जितेश ( Jitesh Sharma) २०१८मध्ये मुंबई इंडियन्सचाच सदस्य होता, परंतु त्याला संधी मिळाली नव्हती. आज त्याने त्याच संघाविरुद्ध वादळी खेळी केली. लिव्हिंगस्टोनने जितेशसोबत ५३ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी केली. MIचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) आज सपशेल अपयशी ठरला आणि रोहित शर्मासाठी ही खूप मोठी डोकेदुखी बनली.
MIचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शद खानने त्याच्या पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंगला ( ९) यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. शिखऱ धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. MIचा यशस्वी गोलंदाज पियूष चावलाला गब्बरने चांगले झोडले होते, परंतु त्यानेच शिखरची विकेट घेतली. २० चेंडूंत ३० धावा करून शिखर यष्टिचीत झाला. या विकेटसह पियूषने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये लसिथ मलिंगाला ( १७०) मागे टाकून चौथे स्थान पटकावले. त्याने MIसाठी डोकेदुखी ठरलेल्या मॅथ्यू शॉर्टचा त्रिफळा उडवताना आयपीएलमध्ये १७२ विकेट्स पूर्ण केल्या आणि अमित मिश्राशी बरोबरी केली. शॉर्ट २७ धावांवर बाद झाला. पियूषने आज २९ धावांत २ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"