Join us  

IPL 2023, MI vs SRH Live : ११ चेंडूंत चोपल्या ४८ धावा! २३ वर्षीय विवरांत शर्माच्या फटकेबाजीने मुंबईला हुडहुडी

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबादने रविवारी मुंबई इंडियन्सची घरच्या मैदानावर धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 4:49 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबादने रविवारी मुंबई इंडियन्सची घरच्या मैदानावर धुलाई केली. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सला आज विजय मिळवणे महत्त्वाचे होते. पण, काल जी चतुराई महेंद्रसिंग धोनीने दाखवली, ती रोहित शर्माला दाखवता आली नाही. दुपारच्या सामन्यात नाणेफेक जिंकूनही मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. SRHचे सलामीवीर विवरांत शर्मा व मयांक अग्रवाल या जोडीने MIच्या गोलंदाजांची धुलाई केली. 

१४ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम असलेल्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धची ही लढत MI ला काही समीकरणासह जिंकावी लागेल. कारण १४ गुणांसह RCB प्ले ऑफच्या शर्यतीत नेट रन रेटच्या जोरावर आघाडीवर आहे. त्यामुळे MI ला नेट रन रेट सुधारण्यासाठी हा सामना ७० किंवा त्यापेक्षा जास्त चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. SRH ने आज विवरांत शर्मा व मयांक अग्रवाल ही नवी जोडी सलामीला पाठवली. या जोडीनं सावध खेळ करताना खेळपट्टीवर जम बसवला अन् त्यानंतर मोठे फटके खेचण्यास सुरूवात केली. सूर्यकुमारने चौथ्या षटकात मयांकला रन आऊट करणअयाची सोपी संधी गमावल्याने रोहित शर्मा नाखूश दिसला. SRH ने पॉवर प्लेमध्ये बिनबाद ५३ धावा केल्या.

रोहितने पहिल्या ७ षटकांत ६ गोलंदाजांचा वापर केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. MIचा यंदाच्या पर्वातील यशस्वी गोलंदाज पियूष चावला याचीही SRHच्या सलामीवीरांना धुलाई केली. विवरानने ३६ चेंडूंत आयपीएलमधील त्याचं पहिलंच अर्धशतक पूर्ण केले आणि मयांकसह शतकी भागीदारी पूर्ण केली. जम्मू-काश्मीरच्या या २३ वर्षीय खेळाडूला २.६ कोटींत SRH ने ताफ्यात घेतले होते आणि आज त्याला खेळण्याची संधी दिली. मयांकनेही ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि यंदाच्या पर्वातील ही त्याची पहिलीच फिफ्टी ठरली. या दोघांनी १४ षटकांत १०च्या सरासरीने १४० धावा जोडल्या. आकाश मढवालने MIला पहिले यश मिळवून दिले, विवरांता ४७ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांवर झेलबाद झाला.

ते ७० चेंडू....! मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मार्गाचं अवघड गणित, जाणून घ्या RCBसाठीचं समीकरण

गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

कोण आहे विवरांत?जम्मू आणि काश्मीरमधील २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडूसाठी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ऑक्शनमध्ये चुरस रंगली होती. २० लाख मूळ किंमत असलेल्या विवरांतला २.६ कोटींत SRH ने करारबद्ध केले. विवरांतने क्रिकेटपटू बनावे यासाठी त्याचा मोठा भाऊ विक्रांत याने खूप मेहनत घेतली. तोही क्रिकेटपटू होता, परंतु २०२०मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यने कुटुंबाचा व्यवसाय सांभाळला. पण, त्याने विवरांतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि आज त्याची मेहनत कामी आली. 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App