IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगच्या १००० व्या सामन्यात मोठा वाद सुरू झाला आहे. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) अविश्वसनीय खेळी केली. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने १२४ धावांची खेळी करताना अनेक विक्रम नावावर केले, परंतु त्याची विकेट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यशस्वीने जॉस बटलरसह ( १८) पहिल्या विकेटसाठी ७.१ षटकांत ७२ धावा जोडल्या. एकामागून एक फलंदाज माघारी जात असताना यशस्वी शड्डू ठोकून उभा राहिला. देवदत्त पडिक्कल ( २), जेसन होल्डर ( ११), शिमरोन हेटमायर ( ८) व ध्रुव जुरेल ( २) हेही आज मोठी खेळी करू शकले नाही. यशस्वी ६२ चेंडूंत १२४ धावांवर बाद झाला. अनकॅप्ड फलंदाजांमधील ही सर्वोत्तम खेळी ठरला. त्याच्या या खेळीत १६ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. राजस्थानने ७ बाद २१२ धावा केल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2023, MI vs RR Live : No Ball वर यशस्वी जैस्वालला OUT दिला; रोहित शर्मा अन् अम्पायरवर होतायेत आरोप
IPL 2023, MI vs RR Live : No Ball वर यशस्वी जैस्वालला OUT दिला; रोहित शर्मा अन् अम्पायरवर होतायेत आरोप
IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगच्या १००० व्या सामन्यात मोठा वाद सुरू झाला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 22:09 IST